ETV Bharat / bharat

लालूंच्या 'आरजेडी' चे अस्तित्व धोक्यात, लोकसभा निवडणुकीत झाला सुपडासाफ - party

आरजेडी स्थापन झाल्यापासून सर्वात कमी जागांवर पक्षाने उमेदवार दिले होते. मात्र, पक्षाला सर्वात कमी म्हणजे १५.३६ टक्केच मतदान झाले. याविषयी पक्ष विचार मंथन करणार आहे. मात्र, त्याच्या आधीच प्रताप सिंह यांनी जनता दरबार भरवण्याची घोषणा करुन पक्षासमोरच्या अडचणीमध्ये वाढ केली आहे.

लालूंच्या 'आरजेडी' चे अस्तित्व धोक्यात, लोकसभा निवडणुकीत झाला सुपडासाफ
author img

By

Published : May 26, 2019, 6:19 PM IST

पाटणा - बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाची स्थापना १९९७ मध्ये झाली होती. स्थापनेनंतर लालूंनी पक्षाला यशाच्या शिखरावर नेले. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत पक्ष सध्या सर्वात वाईट परस्थितीतून जात आहे. याचे उदाहरण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

आरजेडी स्थापन झाल्यापासून सर्वात कमी जागांवर पक्षाने उमेदवार दिले होते. मात्र, पक्षाला सर्वात कमी म्हणजे १५.३६ टक्केच मतदान झाले. याविषयी पक्ष विचार मंथन करणार आहे. मात्र, त्याच्या आधीच प्रताप सिंह यांनी जनता दरबार भरवण्याची घोषणा करुन पक्षासमोरच्या अडचणीमध्ये वाढ केली आहे.

महागठबंधनची परिस्थिती वाईट -

लालू प्रसाद यांच्या अनुपस्थितीत यावेळी लोकसभा निवडणूक लढवली गेली. तेजस्वी यादव महागठबंधनचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली. महागठबंधनला १ जागा जिंकता आली. ती जागा सुध्दा काँग्रेसने जिंकलेली आहे. मात्र, आरजेडी, रालोसपा आणि वीआईपी या पक्षांना खातेही खोलता आले नाही.

आरजेडीला खातेही खोलता आले नाही -

२०१९ मध्ये लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरजेडीने काँग्रेस, रोलोसपा, वीआईपी आणि हम यांच्यासोबत गठबंधन केले होते. यावेळी जागावाटपनंतर आरजेडी १९ जागांवर निवडणूक लढवत होता. त्यांनी जोरात प्रचार केला. मोठ्या प्रचार सभा घेतल्या. मात्र, पक्ष एकही जागा जिंकू शकला नाही.

मतदानाच्या टक्केवारी मोठ्या प्रमाणात घट -

आरजेडी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत २००४ मध्ये ३०.६ टक्के मत मिळाली होती. मात्र, यावेळी त्यांना फक्त १५.३६ टक्के मत मिळाली आहेत.

निकालाचे होणार मंथन-

लोकसभा निवडणुकीत सुपडासाफ झाल्यानंतर आता पक्ष या निकालाचे मंथन करनार आहे. सध्या पक्षाचे विधानसभेत जास्त आमदार आहेत. २०२० मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पक्षाची पुढची रणनिति काय असेल याचा विचार या बैठकीत होणार आहे.

Intro:Body:

Bihar News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.