ETV Bharat / bharat

भारत-चीन सैन्य झटापट : पंतप्रधान शुक्रवारी घेणार सर्वपक्षीय बैठक... - narendra modi latest news

लडाख प्रांतातील गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यात झटापट झाली होती. यावेळी कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसला, तरीही झटापटीत २० भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. तसेच चीनच्या सैन्यातील ४२ जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये मृतांची संख्या देखील मोठी आहे. यानंतर सीमेवरील तणाव वाढला आहे. गेल्या पाच दशकांमध्ये अशी घटना पहिल्यांदाच झाली आहे.

Ladakh face-off:PM convenes all-party meeting on Friday
भारत-चीन सैन्य झटापट : पंतप्रधान शुक्रवारी घेणार सर्वपक्षीय बैठक..
author img

By

Published : Jun 17, 2020, 4:17 PM IST

Updated : Jun 17, 2020, 4:44 PM IST

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव, आणि सोमवारी रात्री दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. शुक्रवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ती व्हर्चुअली बोलावण्यात आली आहे.

लडाख प्रांतातील गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यात झटापट झाली होती. यावेळी कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसला, तरीही झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. तसेच चीनच्या सैन्यातील ४२ सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये मृतांची संख्या देखील मोठी आहे. यानंतर सीमेवरील तणाव वाढला आहे. गेल्या पाच दशकांमध्ये अशी घटना पहिल्यांदाच झाली आहे.

कालपासूनच याबाबत मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील याप्रकरणी पंतप्रधानांची भेट घेतली. तसेच लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि सीडीएस बिपीन रावत यांच्यासोबत देखील काही बैठका पार पडल्या.

मोदींनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली..

आज पंतप्रधान मोदींनी, वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. मंत्रिमंडळाच्या ऑनलाइन मीटिंग नंतर त्यांनी देशाला संबोधित केले. यावेळी सैन्याला कारवाई करण्यासाठी योग्य ती सूट दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण देश भारतीय लष्कराच्या पाठिशी असल्याचे ते म्हणाले. भारतावर कोणीही आक्रमण केल्यास देश जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

हेही वाचा : ''गलवान' व्हॅली आमचीच... भारताने आपल्या सैन्याला आवर घालावा'

Last Updated : Jun 17, 2020, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.