ETV Bharat / bharat

केरळ विमान अपघातातील 56 जखमी प्रवाशांना रुग्णालयातून 'डिस्चार्ज', एअर इंडिया एक्सप्रेसची माहिती

शुक्रवारी केरळ येथील कोझिकोड (कालिकत) येथे झालेल्या विमान अपघातातील जखमींंपैकी 56 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, अशी माहिती एअर इंडिया एक्सप्रेसने दिली आहे.

air india express plane
air india express plane
author img

By

Published : Aug 10, 2020, 3:36 PM IST

नवी दिल्ली - केरळमधील कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईमधील प्रवाशांना घेऊन येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातातील 56 जखमी प्रवाशांना रुग्णायातून सोडण्यात आले आहे, अशी एअर इंडिया एक्सप्रेसने दिली.

एअर इंडियाचे बोइंग 737 विमान दुबईहून 190 जणांसह कोझिकोडला पोहोचले होते. विमानतळावर लँडिंगदरम्यान ते 35 फूट खोल दरीत पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले. यात काहींचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले. जखमींना कोझिकोड येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.

जखमींपैकी 56 प्रवासी हे बरे झाले असून त्यांंना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, जखमींना उपचारादरम्यान कोणतेही अडचणी येऊ नयेत यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसचे वरीष्ठ अधिकारी कोझिकोड येथे तळ ठोकून असल्याचे ही सांगण्यात आले आहे.

या अपघातात वैमानिक डी.व्ही. साठे व अखिलेश कुमार यांनीही आपला जीव गमावला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलेल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.