कोलकाता - जग दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. तसेच त्यात बदलही घडत आहेत. वातावरणातही बदल होत आहेत. सिंगल यूज प्लास्टिक कचऱ्यात वाढ हे जागतिक तापमान वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. हा प्लास्टिक कचरा समाजासाठी जणू शाप आहे.
फक्त म्हणण्यापुरते केंद्र सरकार आणि आणि राज्य सरकारांनी प्लास्टिक बंदीची घोषणा केली. मात्र, खरी परिस्थिती वेगळीच आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात प्लास्टिक कचऱ्याचे ढिग साचले आहेत. मात्र, जवळील बांगूर एवेन्यू हे ठिकाण स्वच्छतेचे मूर्तिमंत उदाहरण ठरत आहे.
हेही वाचा - नो टू सिंगल युज प्लास्टिक: हैदराबादच्या युवकानं बनवलं विना प्लास्टिक क्रेडिट कार्ड
बांगूर एवेन्यू भागात राहणारे नागरिक प्लास्टिकचा वापर करत नाहीत. त्याऐवजी पेपर पासून बनवलेली पाकिटे आणि कापडी पिशव्यांचा वापर करतात. येथील दुकानदारही प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता सरकारी नियमांचे पालन करतात.
जर तुम्ही कोलकात्याच्या बाजारामध्ये जाल तर तुम्हाला प्लास्टिक पिशव्या सररास पहायला मिळतील. मात्र, बांगूर एवेन्यू येथील बाजारामध्ये एकही प्लास्टिकची पिशवी पहायला मिळणार नाही. येथील मोठ्या दुकानदारांसह छोटे दुकानदारही कागदी पॅकेटचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी बांगूर एवेन्यू भागात पावसाचे पाणी साठून राहण्याची समस्या होती. मात्र, या भागात आता पाणी तुंबण्याची समस्या राहिली नाही.
हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : हैदराबादमधील 'प्लांट फॉर प्लास्टिक अभियान' अन् 'टिफिन बॉक्स चॅलेंज'
लोकांना जागरूक करण्यासाठी बांगूर एवेन्यूचे माजी नगरसेवक मृगांक भट्टाचार्य यांनी एकट्याने हे पाऊल उचले आहे. ते म्हणाले, 'लोकांना घरोघरी जाऊन प्लास्टिकच्या धोक्याविषयी जागरूक केले. तसेच प्लास्टिक न वापरण्याबाबत दुकानदारांनाही जागरूक केले. जर आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा असेल तर प्लास्टिकचे उत्पादन थांबवले पाहिजे.
जेव्हा आपण बाजारातून काही सामान आणतो, जसे की कपडे खरेदी करतो. त्या पिशव्या मजबूत असल्याने आपण त्यांना अनेक वेळा वापरतो. ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आपण वापरल्यानंतर लगेच फेकून देतो त्यांच्यावर बंदी आणायला पाहिजे. आधी आपण प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मितीवर बंदी आणायला हवी, त्यानंतरच आपण त्याच्या वापरावर नियंत्रण आणू शकतो.
हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : हैदराबादमध्ये सुरू झालं 'झीरो वेस्ट इको स्टोअर'
जेव्हा भट्टाचार्य यांनी प्लास्टिक विरोधी उपक्रमाची सुरुवात केली तेव्हा कोणीही त्यांना साथ दिली नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी नागरिकांना आणि दुकानदारांना जागरूक करण्याचे काम त्यांनी सुरूच ठेवले आहे. त्यामुळेच बांगूर एवेन्यू प्लास्टिक मुक्त झाले आहे.