नवी दिल्ली - आठवड्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ धडकल्यानंतर देश नव्या चक्रीवादळाला सामोरे जात आहे. हे निसर्ग नावाचे चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
निसर्ग हे चक्रीवादळाचे नाव भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशने दिलेले आहे. बांगलादेशने ओडिसामध्ये आलेल्या फनी या चक्रीवादळालाही 2019 मध्ये नाव दिले होते.
भारतीय महासागरामध्ये येणाऱ्या वादळांचे नाव निश्चित करण्यासाठी 2000 मध्ये समिती तयार करण्यात आली होती. त्याबाबतचा फार्मूला 2004 मध्ये निश्चित करण्यात आला आहे. यापुढे येणाऱ्या वादळाची नावेही निश्चित करण्यात आली आहेत. भारताने सुचवलेले गती, इराणने सुचलेले निवर, मालदीवने सुचवलेले बुरेवी, म्यानमारने सुचवलेले तौकताय आणि यास हे ओमनने सुचवलेले अशी चक्रवादळांची नावे यापुढे असणार आहेत.
चक्रीवादळांची नावे हे निश्चित केल्याने वैज्ञानिक समुदायाला आपत्कालीन व्यवस्थापनाला मदत होते. त्यामधून जनजागृती होते आणि मोठ्या प्रमाणात लोकांना धोक्याचा इशाराही परिणामकारकतेने मिळतो.
भारतीय हवामान खात्याला चक्रीवादळाची नावे सुचविणे बंधनकारक आहे. त्यासाठी हवामान खात्याला काही प्रक्रियाही पूर्ण कराव्या लागतात.
भारतीय हवामान खात्याने यापूर्वी काही चक्रीवादळांची नावे सुचविली होती. यामध्ये अर्णव, निसर्ग, आग, अझर, प्रभंजन तेज, गति व लुलू या नावांचा समावेश आहे.
चक्रीवादळाचे नाव राजकारण, लिंग, प्रदेश व संस्कृती यासंदर्भात नसावे भारतीय हवामान खात्याकडून काळजी घेण्यात येते. चक्रीवादळाचे नाव हे लहान आणि उच्चारण्यास सोपे असण्यावर हवामान खात्याचा भर असतो.
अरबी समुद्रात मोठा दबाव निर्माण होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर लवकरच निसर्ग चक्रीवादळ येणार आहे.
हे चक्रीवादळ महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर 3 जूनला दुपारनंतर धडकणार आहे.