मेष - आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी - व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. भावंडांशी सलोखा राहील. त्याचा फायदा मिळेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
वृषभ - आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे.
मिथुन - आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्य जीवनात सुख - समाधान लाभेल. आर्थिक लाभ व नियोजन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे.
कर्क - आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा होईल. संभाव्य वाद टाळण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवा. इतरांचे गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मान - प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे.
सिंह - कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. मनःस्थिती चांगली नसल्याने महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये. संततीशी चर्चा होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ मिळेल.
कन्या - सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणार्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. पित्याकडून लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ - आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल. परदेशगमनाच्या संधी येतील व परदेशस्थ स्नेह्यांकडून बातम्या मिळतील. प्रकृती यथा तथाच राहील. संततीच्या समस्या मनात चिंता वाढवतील.
वृश्चिक - उक्ती व कृती यांवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे - पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. अभ्यासासाठी आजचा दिवस चांगला आहे. चिंतन - मनन यात वेळ घालवाल. त्यामुळे मानसिक शांती मिळण्या बरोबरच व्याधी दूर राहतील.
धनू - मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. बौद्धिक, तार्किक विचार विनिमय होईल. भागीदारीत लाभ होईल.
मकर - आजचा दिवस व्यापार - व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात - निर्यातीचा व्यापार करणार्यांना फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. कायदेशीर बाबींसंबंधी सावध राहाल. प्रकृती उत्तम राहील. विरोधकांचे प्रयास निष्प्रभ होतील.
कुंभ - आज आपण बौद्धिक क्षमता, लेखनकार्य व नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. स्त्रीयांनी आपली वाणी संयमित ठेवावी. शक्यतो आज प्रवास टाळावेत. संतती संबंधी प्रश्न भेडसावतील. आज नवीन काम सुरू न करणे हितावह राहील. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता असल्याने त्याची तरतूद करून ठेवावी.
मीन - आज घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. घरातील वातावरण बिघडू नये ह्यासाठी संभाव्य वाद टाळावेत. आईचे आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी संभवते. स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे. उत्साह व स्फूर्तीचा अभाव जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावेत. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. आज आपण अती हळवे झाल्याचा त्रास होईल.