ETV Bharat / bharat

'या' राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी...तर 'या' दोन राशीच्या लोकांनी आपल्या जिभेवर ठेवावा ताबा - राशी भविष्य

जाणून घ्या आज काय लिहिलयं आपल्या राशीत...

horoscope
राशी भविष्य
author img

By

Published : Feb 17, 2020, 7:31 AM IST

मेष - आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल. आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. वाणी व द्वेष भावना ह्यांवर आवर घालावा लागेल. शक्यतो नवीन कार्यारंभ करू नये. प्रवासात त्रास संभवतो.

वृषभ - आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रां कडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्‍यांना व्यापारात वृद्धी होईल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत यश व प्रतिष्ठा मिळेल.

मिथुन - आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातील रागावर आवर घालण्याची मात्र आवश्यकता आहे.

कर्क - आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल. आज यात्रा, प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात करणे हितावह होऊ शकणार नाही. पोटाच्या व पचनाच्या तक्रारी त्रास देतील.

सिंह - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की त्यामुळे आपणास दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे आपणास त्रास होईल. मातेचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. अती संवेदनशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. नोकरीतील वातावरण चिंताग्रस्त राहील. संपत्तीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल.

कन्या - आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भावंडांशी संबंधात सौहार्द राहील. मित्र व स्नेह्यांशी संवाद साधू शकाल. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.

तूळ - आज आपली मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबीयांशी मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. आरोग्य बिघडेल. मनात ग्लानी निर्माण होईल. अवैध प्रवृत्तीत सहभागी होऊ नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येतील.

वृश्चिक - आजचा दिवस साधारणच आहे. तन - मनाला सुख - आनंद मिळेल. कुटुंबियांसह उत्साहात व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी आनंददायी बातमी मिळेल. प्रवास सुखद होतील. उत्तम वैवाहिक सुख उपभोगता येईल.

धनू - आज आपल्या रागामुळे कुटुंबीय व इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे हे एखाद्या वादाचे कारण ठरेल. एखादी दुर्घटना संभवते. आजारावर खर्च होईल. न्यायालयीन कामकाजात दक्षतेने पाऊल उचलावे. निरुपयोगी कामांवर आपली शक्ती खर्च होईल.

मकर - आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. पत्नी व संततीचा सहवास लाभेल. खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शेअर बाजारातून फायदा होईल. पत्नीच्या स्वास्थ्या विषयी चिंता निर्माण होईल.

कुंभ - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. वरिष्ठ व वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळाल्याने मनावरील ताण कमी होईल. गृहजीवन आनंदी राहील. मान - मरातब वाढतील.

मीन - मनातील दुःख व अशांतता ह्याने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. पोटाची तक्रार राहील. नशिबाची साथ लाभणार नाही. मनात नकारात्मक विचार येतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.