ETV Bharat / bharat

गोव्यात आजपासून पुढील ३ दिवस 'किंग मोमो'चे राज्य

विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने सहभागी होत कार्निव्हलचा आनंद घेतला. चित्ररथ पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. या काळात या मार्गाने होणारी वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आली होती.

गोवा कार्निव्हल
author img

By

Published : Mar 3, 2019, 12:05 AM IST

पणजी - गोव्याची सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आणि जनमानसातील लोकप्रिय कलाकृती यांचा सुरेख संगम शनिवारी गोवा कार्निव्हलमध्ये दिसून आला. हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर, पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी चित्ररथ मिरवणुकीला झेंडा दाखवला आणि किंगमोमोने 'खा, प्या, मजा करा' असा संदेश दिला.

गोवा कार्निव्हल

गोवा सरकारच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने पणजी महानगरपालिकेच्या वतीने कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात शनिवारी मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्र ते दोनापावल या मार्गावरील चित्ररथ मिरवणुकीने झाला. यासाठी दुपारपासूनच नागरिक आणि पर्यटक कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. यासाठी संपूर्ण राजधानी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कार्निव्हल मिरवणुकीत राज्यभरातील ६८ चित्ररथ मंडळे सहभागी झाली. यामध्ये राज्यातील घडामोडी आणि परंपरायावर भाष्य करणारे आकर्षक चित्ररथ सादर करण्यात आले होते. पारंपरिक पध्दतीने 'फेणी' तयार करण्याची पद्धती, जुलै २०१८ मध्ये समोर आलेला मासळीतील फॉर्मेलीन या घातक रसायानचा प्रश्न, शेवटची घटका मोजणारे पारंपरिक तांब्या उद्योग, हस्तकला उद्योग, ग्रामीण समाजजीवन, पावभट्टी, गोव्याचा वारसा याबरोबरच भारतीय सैनिक आदी प्रामुख्याने चित्ररथाच्या माध्यमातून सादर करण्यात आले. त्याबरोबर चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या 'बँटसमन, मोगली या व्यक्तीरेखा आणि पर्यावरण संरक्षण, गोव्यातील वन्यजीव, मिशन रेबिजचे उपक्रम आदीचे प्रदर्शनही सादर करण्यात आले होते. तसेच अनेक कलाकारांनी वैयक्तिक पातळीवर कलाकृती सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.

विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने सहभागी होत कार्निव्हलचा आनंद घेतला. चित्ररथ पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. या काळात या मार्गाने होणारी वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आली होती. उद्घाटनांतर बोलताना पर्यटन मंत्री आजगावकर यांनी या कार्निव्हलच्या माध्यमातून गोव्याची संस्कृती आणि परंपरा देशविदेशातील लोकांसमोर मांडली जाईल, असे सांगितले.

undefined

Intro:पणजी : गोव्याची सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा, राज्य आणि देशातील घडामोडी, जनमानसातील लोकप्रिय कलाकृती यांचा सुरेख संगम आज गोवा कार्निव्हलमध्ये दिसून आला. हजारो पर्टक आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर, पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी चित्ररथ मिरवणुकीला झेंडा दाखवला आणि किंगमोमोने 'खा, प्या, मजा करा' असा संदेश दिला.

Body:गोवा सरकारच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने पणजी महानगरपालिकेच्यावतीने कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात आज मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्र ते दोनापावल या मार्गावरील चित्ररथ मिरवणुकीने झाला. यासाठी दुपारपासूनच नागरिक आणि पर्यटक कार्यक्रम स्थळी दाखल झाले होते. यासाठी संपूर्ण राजधानी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कार्निव्हल मिरवणुकीत राज्यभरातील ६८ चित्ररथ मंडळे सहभागी झाली. यामध्ये राज्यातील घडामोडी आणि परंपरा.यावर भाष्य करणारे आकर्षक चित्ररथ सादर करण्यात आले होते. पारंपरिक पध्दतीने 'फेणी' तयार करण्याची पद्धती, जुलै २०१८ मध्ये समोर आलेला मासळीतील फॉर्मेलीन या घातक रसायानचा प्रश्न, शेवटची घटका मोजाणार पारंपरिक तांब्या उद्योग, हस्तकला उद्योग, ग्रामीण समाजजीवन, पावभट्टी, गोव्याचा सांगितिक वारसा या बरोबरच भारतीय सैनिक आदी प्रामुख्याने चित्ररथाच्या माध्यमातून सादर करण्यात आले. त्याबरोबर चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या 'बँटसमन, मोगली ' या व्यक्तीरेखा आणि पर्यावरण संरक्षण, वाघाची पर्यावरणासाठी आवश्यकता, गोव्यातील वन्यजीव, मिशन रेबिजचे उपक्रम आदीही सादर करण्यात आले होते. तसेच अनेक कलाकारांनी वैयक्तिक पातळीवर कलाकृती सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
यासाठी विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने सहभागी होत कार्निव्हलचा आनंद घेत होते. चित्ररथ पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. या काळात या मार्गाने होणारी वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आली होती.
उद्घाटनांतर बोलताना पर्यटन मंत्री आजगावकर कार्निव्हल सुरू झाल्याची घोषणा करत यामाध्यमातून गोव्याची संस्कृती आणि परंपरा देशविदेशातील लोकांसमोर मांडली जाईल, असे सांगितले.
.....
दुपारी किंगमोमो चित्ररथ व्हीडीओ पाठवला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.