नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांनी एनईईटी आणि जेईईबद्दल बोलावे अशी लोकांची इच्छा होती. मात्र, त्यांनी 'परीक्षा पे चर्चा' करायची टाळून 'खिलोने पे चर्चा' केली, असा टोमणा राहुल यांनी मारला.
पंतप्रधानांनी 'मन की बात' करण्यापेक्षा 'स्टुडंटस् की बात' करायला होती, असे ट्विट राहुल यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी आज 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातील भाषणात 'जगासाठी खेळणी' बनवण्याविषयी उद्योगाला चालना देण्याचा विषय मांडला. त्यांनी 'टॉय हब' बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर प्रकाश टाकला.
-
JEE-NEET aspirants wanted the PM do ‘Pariksha Pe Charcha’ but the PM did ‘Khilone Pe Charcha’.#Mann_Ki_Nahi_Students_Ki_Baat
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">JEE-NEET aspirants wanted the PM do ‘Pariksha Pe Charcha’ but the PM did ‘Khilone Pe Charcha’.#Mann_Ki_Nahi_Students_Ki_Baat
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 30, 2020JEE-NEET aspirants wanted the PM do ‘Pariksha Pe Charcha’ but the PM did ‘Khilone Pe Charcha’.#Mann_Ki_Nahi_Students_Ki_Baat
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 30, 2020
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (एनईईटी) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) सप्टेंबरमध्ये होणार आहे. यावरही राहुल यांनी टिप्पणी केली. विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजाराच्या परिस्थितीत परीक्षा घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी आणि विरोधी पक्षांकडून निदर्शने केली जात आहेत.
विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांतील सहा मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल केली आहे. या संदर्भातील यापूर्वीच्या आदेशाचा आढावा घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यासाठी निर्देश मागितले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने 17 ऑगस्ट रोजी सप्टेंबर 2020 मध्ये होणाऱ्या एनईईटी आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भविष्य जास्त काळ संकटात आणता येणार नाही, ही बाब अधोरेखित केली होती.