ETV Bharat / bharat

केरळच्या प्राध्यापकाने बनवले कमी खर्चातले 'पोर्टेबल व्हेंटिलेटर' - Low-cost ventilator

कोविड-19 मुळे व्यक्तीच्या श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. जगभरात सध्या आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे अनेक मृत्यू झालेले आहेत. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण हे उपकरण बनवले असल्याचे डॉ. प्रदीप यांनी सांगितले.

केरळच्या प्राध्यापकाने बनवले कमी खर्चातले 'पोर्टेबल व्हेंटिलेटर'

author img

By

Published : Apr 4, 2020, 3:38 PM IST

कसारागोड - केरळमध्ये कोविड-19 ने थैमान घातले आहे. प्रशासन वैद्यकीय विभाग आणि राज्यातील लोक याचा युद्धपातळीवर सामना करत आहेत. येथील कसारागोड शासकीय महाविद्यालयाच्या एका भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकाने श्वासोच्छवासाला मदत करणारे एक नाविन्यपूर्ण कमी खर्चातील पोर्टेबल उपकरण बनवले आहे.

केरळच्या प्राध्यापकाने बनवले कमी खर्चातले 'पोर्टेबल व्हेंटिलेटर'

डॉक्टर ए. व्ही. प्रदीप असे या प्राध्यापकाचे नाव असून ते कन्नूर मधील पय्यानुर येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिलिकॉन पासून बनवलेल्या या व्हेंटिलेटरचे 'आर्टिफिशियल मॅन्युअल ब्रीदिंग युनिट' असे नाव आहे.

या उपकरणाचा वयस्कर आणि ज्यांच्यात आजाराचा सहजपणे शिरकाव होऊ शकतो अशा वृद्धांसाठी आणि विशेषतः हृदयविकार आणि दोन प्रकारचा डायबिटीस असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी चांगला उपयोग होऊ शकतो.

कोविड-19 मुळे व्यक्तीच्या श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. जगभरात सध्या आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे अनेक मृत्यू झालेले आहेत. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण हे उपकरण बनवले असल्याचे प्रदीप यांनी सांगितले.

डॉक्टर प्रदीप यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना यातील ऑक्सिजन निर्माण करणारे घटक आणि डीसी इलेक्ट्रिक मोटर मायक्रो कंट्रोलर आणि मोटर कंट्रोलर अशा वेगवेगळे भागांची माहिती दिली. हे उपकरण रुग्णाला आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करते. यातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी-जास्त प्रमाणात करता येतो. यासाठी मोटर बसवण्यात आली आहे. या यंत्रासाठी 12 व्होल्टची बॅटरी लागते. असे हे यंत्र केवळ तीन हजार रुपयात तयार करता येते, असा दावा प्रदीप यांनी केला आहे. सध्या उपलब्ध असलेले बहुतेक भारी किमतीच्या संगणक नियंत्रित व्हेंटिलेटरची किंमत 40 लाखापर्यंत आहे. तर, मर्यादित संख्येत उपलब्ध असलेल्या परदेशातून आणण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरची किंमतही 15 लाखापर्यंत आहे आणि भारतीय बनावटीच्या व्हेंटिलेटरची किंमत सहा लाखापर्यंत आहे.

सध्या देशामध्ये 40 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. यातील बहुतेक खाजगी रुग्णालयांमध्ये आहेत. भारतीय औद्योगिक क्षेत्र एका महिन्याला जास्तीत जास्त सहा हजार व्हेंटिलेटरचे अंदाजे उत्पादन घेऊ शकते. मात्र सध्या भारतात तयार होणाऱ्या व्हेंटीलेटर्समध्येही पुष्कळसे भाग परदेशी बनावटीचे वापरले जातात. सध्या कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते मिळणे अशक्‍य बनले आहे. कारण, प्रत्येक देशांमध्ये तेथील वेंटीलेटरर्सची संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत डॉ. प्रदीप यांचे संशोधन महत्त्वाचे ठरणआर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.