कन्नूर(केरळ) - मल्याळममध्ये एक म्हण आहे - ‘कुन्न्नलाम अग्राहिचल कुन्नीकुरुवोलम किट्टम’ याचा अर्थ जर तुम्ही डोंगरासारखी मोठी गोष्ट मिळवायचे ध्येय ठेवले तर आपल्याला एक जपमाळेसारखी गोष्ट मिळेल, असा आहे. माणसाने नेहमीच मोठे होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. जेव्हा तो असे करतो, तेव्हा अयशस्वी झाला तरीही त्यांना किमान पुढे उत्तम गोष्ट मिळते. वरील म्हणी प्रमाणे केरळचा गिर्यारोहक चेरुकुन्निल मनीष यांनी देखील मोठे स्वप्न पाहिले आहे. जगातील सर्वाधिक शिखरे सर करण्याचे ध्येय मनीष यांनी ठेवले आहे.
40 वर्ष वय असणाऱ्या मनीष यांनी 16 वर्षात आतापर्यंत 13 शिखरांची यशस्वीपणे चढाई केली आहे. आणखी बरीच शिखरे सर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी माउंट एव्हरेस्टची चढाई करण्यासाठी तयारी केली होती. मात्र, कोरोना विषाणू प्रसारामुळे नियोजन लांबणीवर टाकावे लागले. इतिहासाचा पदवीधर असलेल्या मनीष यांना डोंगर, शिखर, पर्वत यांची आवड होती. त्यांनी माऊंट आल्प्स आणि माऊंट एव्हरेस्टबद्दल वाचन केले आहे.
मनीष हे मजूर म्हणून काम करत होते. आपल्याकडे असलेल्या सर्व पैशांसह दिल्ली जायचे तिकीट बुक केले. गिर्यारोहण करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ते 2004 मध्ये निघाले. मनाली येथील अटल बिहारी गिर्यारोहण संस्थेत गिर्यारोहणाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी मनालीतील माउंट फ्रेंडशिप सर केले, त्याची उंची 17,346 फूटआहे. 20 दिवसांच्या आत शिखर सर करणारे मनीष हे एकटे होते. ते 35 पर्वतारोहकाच्या गटातील एकमेव दक्षिण भारतीय होते.
गिर्यारोहण करताना विविध अडचणी येत असल्यातरी त्यानंतर मिळणारा आनंद वेगळाच असतो, असे मनीष यांनी सांगितले. गिर्यारोहण क्षेत्रात विक्रम करण्याचा मनोदय असल्याचे मनीष यांनी सांगितले.