तिरुवअनंतपुरम - लॉकडाऊनच्या काळात डॉक्टरांची परवानगी असेल, तर संबंधित व्यक्तीला दारू उपलब्ध करून द्यावी, असा निर्णय केरळ सरकारने घेतला होता. केरळच्या उच्च न्यायालयाने मात्र गुरूवारी या निर्णयास स्थगिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर, राज्यातील आमदार टी. एन. प्रतापन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तसेच, ही स्थगिती तात्पुरती आहे, यावरील पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार असल्याचेही उच्च न्यायालयाने सांगितले.
सोमवारी रात्री सरकारने याबाबत घोषणा केली होती. या निर्णयाला डॉक्टरांच्या संघटनेचा विरोध होता, तरीही सरकारने हे आदेश दिले होते. या आदेशानुसार, डॉक्टरांची परवानगी घेऊन येणाऱ्या व्यक्तीला लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तीन लिटर दारू देण्यात येणार होती.
हेही वाचा : 'नियोजनाअभावी केलेल्या लॉकडाऊनमुळे देश संकटात'