ETV Bharat / bharat

'हाऊडी मोदी' नंतर आता होणार 'केम छो ट्रम्प'... - trump in gujrat

अहमदाबादमध्ये होणाऱ्या 'केम छो ट्रम्प' या कार्यक्रमासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपली पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्यासह उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

'Kem cho Trump' will showcase Trump-Modi bonhomie
'हाऊडी मोदी' नंतर आता होणार 'केम छो ट्रम्प'...
author img

By

Published : Feb 12, 2020, 9:42 PM IST

अहमदाबाद - अमेरिकेत पार पडलेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोन नेते एकाच मंचावर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा या दोन नेत्यांना एका मंचावर पाहता येणार आहे, निमित्त आहे, गुजरात मध्ये होणाऱ्या 'केम छो ट्रम्प' कार्यक्रमाचे.

अहमदाबादमध्ये होणाऱ्या 'केम छो ट्रम्प' या कार्यक्रमासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपली पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्यासह उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला साधारणपणे १.२५ लाख लोक उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कार्यक्रमात कित्येक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, ज्यामध्ये शेकडो कलाकार सहभागी असतील.

ट्रम्प हे दिल्लीला न उतरता, थेट अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील, जिथे पंतप्रधान मोदी त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर ते एकत्र साधारणपणे १० किलोमीटर लांब असा मोठा रोड-शो करतील, आणि नंतर साबरमती आश्रमाला भेट देतील.

ट्रम्प आणि मोदी हे हृदय कुंज आणि महात्मा गांधींच्या घरालाही भेट देणार आहेत. जिथे, ट्रम्प हे गांधीजींचा चरखा वापरून पाहतील. यावेळी गांधीजींचे आवडते भजन 'वैष्णव जन तो' हे ऐकवले जाणार आहे. त्यानंतर, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या उद्घाटनासाठी, तसेच 'केम छो ट्रम्प' कार्यक्रमासाठी ते दोघे उपस्थित राहतील.

हेही वाचा : जम्मू काश्मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्याच्या ५ हस्तकांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.