ETV Bharat / bharat

करतारपूर गुरुद्वाराला भेट देण्यासाठी पैसे मोजा, पाकिस्तानने करारात घातला खोडा

author img

By

Published : Oct 18, 2019, 9:02 AM IST

Updated : Oct 18, 2019, 1:08 PM IST

गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूर धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्या भाविकांना २० डॉलर म्हणजेच सुमारे १ हजार ४२० रुपये शुल्क आकारावे असा पाकिस्तानचा आग्रह आहे.

रविश कुमार

नवी दिल्ली - गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूर या पाकिस्तानातील शिखांच्या पवित्र स्थळाला भेट देणाऱ्या भाविकांना शुल्क आकारण्यास पाकिस्तान आग्रही आहे. मात्र, भाविकांना शुल्क आकारू नये असा आग्रह भारताचा आहे. पाकिस्तानच्या या मागणीमुळे करतारपूर कॉरिडॉर करार अडकून पडला आहे. बाकी सर्व गोष्टींवर दोन्ही देशांत एकमत झाले असून फक्त पाकिस्तानच्या शुल्क आकारणीच्या मुद्दयावरून अडकून पडल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांन सांगितले.

  • Raveesh Kr, MEA on whether agreement on Kartarpur Corridor hasn't yet been finalised due to Pak's insistence of a service charge on all devotees visiting Kartarpur Sahib: After several rounds of discussion with Pakistan,we've reached an agreement on all issues, except Service Fee pic.twitter.com/nVYAIAE6we

    — ANI (@ANI) October 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - पोलिसांचा 'अजब' कारभार, ट्रक चालकाला विनाहेल्मेट वाहन चालविल्यामुळे पाठवले चलन

गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूर धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्या भाविकांना २० डॉलर म्हणजेच सुमारे १ हजार ४२० रुपये शुल्क आकारावे असा पाकिस्तानचा आग्रह आहे. मात्र, हा उपक्रम दोन्ही देशातील लोकांना जोडण्यासाठी करण्यात येत आहे, असे भारताचे मत आहे. गुरुनानक साहिब यांच्या ५५० व्या जयंती निमित्त करतारपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण व्हावे, असा भारताचा आग्रह आहे.

यासंबधी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर विविध मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. फक्त शुल्क आकारणीचा मुद्द्यावर एकमत झाले नाही. भाविकांचा विचार करुन शुल्क आकारणी करु नये असे आम्ही पाकिस्तानला सांगितले आहे.

हेही वाचा - काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा सफरचंद व्यापाऱ्यांवर हल्ला; तीन दिवसांमधील तिसरी घटना

करतारपूर साहिब गुरुद्वारा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील नुरवाल जिल्ह्यामध्ये आहे. गुरुनानक यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची १८ वर्ष तेथे घालवली. अखेरचा श्वासही त्यांनी तेथेच घेतला. करतारपूर गुरुद्वारा सीमारेषेपासून ४.५ किमी पाकिस्तानमध्ये असून करतारपूर कॉरिडॉरमुळे भारतातील शीख बांधवांना पाकिस्तानात जाणे सोपे होणार आहे.

हेही वाचा - खराखुरा ड्रॅक्युला! जनावरांचे रक्त पिऊन जगतो आहे 'तो'...

Intro:Body:

national news

Conclusion:
Last Updated : Oct 18, 2019, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.