नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानचे अधिकारी आज करतारपूर कॉरिडॉरसंबंधीची प्रक्रिया आणि तांत्रिक मुद्द्यांवरील द्विपक्षीय बैठकीसाठी एकत्र आले आहेत. पाकिस्तानातील वागाह सीमेवर भारतीय प्रतिनिधिमंडळ पोहोचले आहे. या चर्चेत पाकिस्तानचे २० अधिकारी सहभाग घेणार आहेत. पाक परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल पाक प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करत आहेत. आज करतारपूर कॉरिडॉरसंबंधीच्या दोन्ही देशांच्या धोरणाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
-
#WATCH Indian delegation arrives at Wagah border in Pakistan, to hold bilateral meeting with their Pakistani counterparts on #KartarpurCorridor. pic.twitter.com/PaCuKDMvZf
— ANI (@ANI) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Indian delegation arrives at Wagah border in Pakistan, to hold bilateral meeting with their Pakistani counterparts on #KartarpurCorridor. pic.twitter.com/PaCuKDMvZf
— ANI (@ANI) July 14, 2019#WATCH Indian delegation arrives at Wagah border in Pakistan, to hold bilateral meeting with their Pakistani counterparts on #KartarpurCorridor. pic.twitter.com/PaCuKDMvZf
— ANI (@ANI) July 14, 2019
ही बैठक एका दिवसावर असताना पाकिस्तानने शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे पुनर्गठन केले. यातील नावांच्या यादीमधून खलिस्तानी नेते गोपाल सिंग चावला यांचे नाव वगळण्यात आले आहे. याआधी दोन्ही देशांदरम्यान २ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील बैठक होणार होती. मात्र, पकिस्तानकडून काही वादग्रस्त व्यक्तींची कॉरिडॉरसंबंधी समितीत नेमणूक करण्यात येणार असल्याच्या अहवालांनतर ती चर्चा पुढे ढकलण्यात आली होती.
पंजाबच्या गुरदासपूरमधून सीमेपलीकडे असलेल्या करतारपूर साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गिका खुली करण्याबाबत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात येणार आहे. पाकिस्तानसोबतची आजची चर्चा सफल व्हावी. त्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे, पायाभूत सुविधा आणि धार्मिक यात्रेकरूंची सुरक्षा यांवर चर्चा होणार आहे. यातून सकारात्मक धोरण निश्चित होण्यात अपेक्षा करण्यात येत आहे.
यापूर्वीच्या चर्चेत भारतीय आणि भारतीय वंशाच्या लोकांना पाकिस्तानातील शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारताने केली होती. मात्र पाकिस्ताने याला नकार देत फक्त तीर्थयात्रेमध्ये परवानगी देण्यात येईल असे सांगितले होते. याचबरोबर करतारपूरमधील ऐतिहासिक शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्यासाठी पाकिस्तानने दररोज भारतातील पाच हजार यात्रेकरूंना व्हिसामुक्त प्रवेश द्यावा, अशी मागणी भारताने केली होती.