बंगळुरू : कर्नाटकमध्ये कोरोना मृतदेहांची निष्काळजीपणे होत असलेली हाताळणी थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच जेसीबीच्या सहाय्याने एका कोरोना रुग्णाचे अंत्यसंस्कार केल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवामोग्गामध्ये एका कोरोना मृतदेहाला रहिवासी भागाजवळ दफन केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवामोग्गा जिल्ह्यातील गोपाळगौडा बाडावाने शहरात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा हे याच शहराचे रहिवासी आहेत. गोपाळगौडा भागातील एका रहिवाशाने या प्रकाराचा व्हिडिओ काढल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. यानंतर या भागातील रहिवाशांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन केले.
यापूर्वीही कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यामध्ये एका मोठ्या खड्ड्यात काही कोरोना रुग्णांचे मृतदेह टाकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरुन कर्नाटक सरकारवर सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
हेही वाचा : कोरोना मृतदेहांची हेळसांड; मृत व्यक्तींचे काय आहेत अधिकार?