ETV Bharat / bharat

कर्नाटकातील हुबळीच्या रेल्वे संग्रहालयाचे रेल्वे मंत्री गोयल यांच्या हस्ते लोकार्पण

author img

By

Published : Aug 10, 2020, 10:22 AM IST

रेल्वेच्या दक्षिण -पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या हुबळी येथे हे संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रवासी आणि पर्यटकांना रोलिंग स्टॉक, मलप्रभा आणि घटप्रभा कॉटेज, थिएटर कोच, सरुची कॅफेटेरिया, टॉय ट्रेन, तिकीट-प्रिंटिंग मशीन, मॉडेल ट्रेन आणि लहान मुलांसाठी आकर्षण ठरणाऱ्या वस्तू आणि कलाकृतींची झलक पाहायला मिळेल. येथील प्रवेशद्वार अत्यंत लक्षवेधी ठरते.

Railway museum
Railway museum

बंगळुरू- कर्नाटकातील हुबळी येथे रेल्वेचे संग्रहालय उभारण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रविवारी या संग्रहालयाचे लोकार्पण केले.

रेल्वेच्या दक्षिण - पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या हुबळी येथे हे संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रवासी आणि पर्यटकांना रोलिंग स्टॉक, मलप्रभा आणि घटप्रभा कॉटेज, थिएटर कोच, सरुची कॅफेटेरिया, टॉय ट्रेन, तिकीट-प्रिंटिंग मशीन, मॉडेल ट्रेन आणि लहान मुलांसाठी आकर्षण ठरणाऱ्या वस्तू आणि कलाकृतींची झलक पाहायला मिळेल. येथील प्रवेशद्वार अत्यंत लक्षवेधी ठरते.

याठिकाणी 2 नॅरोगेज रेल्वे इंजिन प्रथमदर्शनी लक्ष वेधून घेतात. या संग्रहालय प्रदर्शनामध्ये रोलिंग स्टॉक (इंजीन), कोच, वॅगन, टँकर, यासारख्या साधनसमग्रीसह रेल्वेच्या जुन्या सिग्नल पद्धती, क्रॉसिंग गेट यांचा या संग्रहालयात समावेश करण्यात आला आहे.

या संग्रहालायची वास्तू 1907 मध्ये बांधण्यात आली आहे. राज्यातील मलप्रभा आणि घटप्रभा या दोन नद्यांची नावे या ऐतिहासिक वास्तूला देण्यात आली आहेत.

या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी गोयल म्हणाले की, रेल्वेचे आपल्या सर्वांसोबत एक भावनिक नाते आहे. रेल्वेने आपल्या जीवनात एक महत्वाची भूमिका निभावली आहे आणि वेगवेगळ्या स्तरावर जीवनाच्या वैयक्तीक प्रवासाची ती एक साक्षीदार आहे.

यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांचा उल्लेख करत हे सांगितले की गांधीजींना रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून देश समजून घेणे आवडत असे. वाफेच्या इंजिनाच्या युगा पासून आधुनिक बुलेट ट्रेनच्या युगापर्यंत रेल्वेच्या बदलाची आणि विकासाची गोष्ट रोमांचकारी काही आणि हे संग्रहालय त्या परिवर्तनाचे स्मारक असल्याचेही गोयल म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.