बंगळुरु - कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. मात्र, पंतप्रधान मोदींचा देशभरात लॉकडाऊन वाढविण्याच्या निर्णय ऐकून कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील एका व्यक्तीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती आहे.
मुर्गेश असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुर्गेश हा आपल्या कुटुंबामध्ये एकटा कमावता होता. मजुरी करून तो आपल्या कुटुंबातील सदस्याचे पोट भरायचा. मात्र, कोरोना संकटामध्ये देशव्यापी लॉकडाउन लागू केल्याने काम बंद झाले आणि कुटुंबाची उपासमार होऊ लागली.
येत्या 14 एप्रिलला लॉकडाऊन संपले आणि आपण काम करून कुटुंबाचे पोट भरू अशी आशा त्याला होती. मात्र, देशातील कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. हे एकूण त्यांची चिंता वाढली आणि त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण बुधवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला