ETV Bharat / bharat

लोकसभेच्या ७ जागा लढणारे पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहतायेत - येडियुराप्पा

कुमारस्वामी यांनी यानंतर राहुल गांधींचे नाव पुढे करत ते पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे म्हटले होते. तर, देवेगौडा हे त्यांचे सल्लागार होतील, असे ते पुढे म्हणाले होते. यावर '७ जागा लढवणारे पंतप्रधान पदाचे किंवा पंतपप्रधानांच्या सल्लागार पदाचे स्वप्न पाहात असल्याचा' टोला येडियुराप्पा यांनी लगावला.

author img

By

Published : Apr 20, 2019, 3:00 PM IST

बी. एस. येडियुराप्पा

शिमोगा - माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यावर '७ जागांवर लढणारे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहात आहेत,' असा टोला भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी लगावला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान देवेगौडा हे मोदींपेक्षा चांगले प्रतपप्रधान असल्याचा दावा केला होता. त्यावर येडियुराप्पा यांनी पलटवार केला आहे.

कुमारस्वामी यांनी यानंतर राहुल गांधींचे नाव पुढे करत ते पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे म्हटले होते. तर, देवेगौडा हे त्यांचे सल्लागार होतील, असे ते पुढे म्हणाले होते. यावर '७ जागां लढवणारे पंतप्रधान पदाचे किंवा पंतपप्रधानांच्या सल्लागार पदाचे स्वप्न पाहात असल्याचा' टोला येडियुराप्पा यांनी लगावला.

कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांपैकी काँग्रेस २१ जागा आणि जेडीएस केवळ ७ जागा लढवणार आहे. यावर काँग्रेस-जेडीएसची आघाडी झाली आहे.

'काँग्रेसने कितीही प्रकारच्या फोडाफोडीच्या क्लृप्त्या शोधू काढल्या तरी, भाजपच विजयी होणार. विधानसभा निवडणुकांनंतर भाजप हा १०४ जागांसह सर्वांत मोठा पक्ष होता. या निवडणुकांमध्येही पक्षाला आत्मविश्वास आहे,' असे येडियुराप्पांनी म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.