बेळगाव - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज कर्नाटकातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा देखील उपस्थित होते.
या दौऱ्यानंतर सांबरा विमानतळावर कर्नाटकचे मुख्य सचिव विजय भास्कर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या पुरामुळे साधारण दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुरामुळे आणि पावसामुळे राज्याचे साधारणपणे दहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आम्हाला तातडीने तीन हजार कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी विनंती आम्ही केली आहे. असे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.