बंगळुरु - कर्नाटक राजकीय पेचामुळे काँग्रेस आणि जेडीएसच्या सकाळपासून सतत बैठका झडत आहेत. सरकार वाचवण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग चोखाळले जात आहेत. शनिवारी सत्ताधारी जेडीएस आणि काँग्रेसच्या ११ आमदारांनी तडकाफडकी राजीनामे दिल्यामुळे सरकार अस्थिर झाले आहे. माजी पंतप्रधान आणि जेडीएस अध्यक्ष देवेगौडा यांनी हा राजकीय पेच सोडवण्याचे नेतृत्व स्वीकारले आहे.
काँग्रेसचे राज्याचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल बंगळुरु येथे आले असून एका खासगी हॉटेलमध्ये ते पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. जेडीएसमधील ज्येष्ठ नेते एच. डी. देवेगौडाही मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या अनुपस्थितीत पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आज सायंकाळी कुमारस्वामी अमेरिकेच्या खासगी दौऱ्यावरून परतत आहेत.
काँग्रेसचे डी. के. शिवकुमार हेही देवेगौडांच्या भेटीला पोहोचले आहेत. शिवकुमार यांनी काल आमदारांचे राजीनामे फाडून टाकत त्यांना सरकारमधून बाहेर पडण्यापासून रोखले होते. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही सर्व काही ठीक असल्याचे म्हटले आहे. 'आघाडी सरकार पडण्याचा धोका नाही. ते सुरक्षित आहे,' असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री बदलाची चर्चा केवळ अफवा - खरगे
वरिष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही बंडखोर आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे. १२ जुलैपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असे खरगे म्हणाले. १२ जुलैला विधानसभेचे सत्र सुरु होणार आहे. तसेच, खरगे यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. 'भाजप केवळ त्यांची सत्ता नसलेल्या राज्यांमधील सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील लोकशाहीला काय झाले आहे, या विचाराने मी चिंतेत आहे. भाजपने राजीनामा देणाऱ्या आमदारांना विशेष विमानाने मुंबईला नेले. जे घडतेय, ते योग्य नाही,' असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस-जेडीएसच्या ११ आमदारांनी शनिवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवले. त्यामुळे अवघे १३ महिन्यांचे आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. राजीनामा देणाऱ्यांपैकी जेडीएसचे आमदार एच. विश्वनाथ यांनी एकूण १४ आमदारांनी राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी अद्याप कोणताही राजीनामा संमत केलेला नाही. राजीनामा दिलेल्यांपैकी १० आमदार सध्या मुंबईत आहेत.
'कर्नाटक राजकीय पेच' निवारणाचा सुकाणू देवे गौडांच्या हाती, कुमारस्वामी लवकरच परतणार - series meetings
जेडीएसमधील ज्येष्ठ नेते एच. डी. देवेगौडाही मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या अनुपस्थितीत पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आज सायंकाळी कुमारस्वामी अमेरिकेच्या खासगी दौऱ्यावरून परतत आहेत.
बंगळुरु - कर्नाटक राजकीय पेचामुळे काँग्रेस आणि जेडीएसच्या सकाळपासून सतत बैठका झडत आहेत. सरकार वाचवण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग चोखाळले जात आहेत. शनिवारी सत्ताधारी जेडीएस आणि काँग्रेसच्या ११ आमदारांनी तडकाफडकी राजीनामे दिल्यामुळे सरकार अस्थिर झाले आहे. माजी पंतप्रधान आणि जेडीएस अध्यक्ष देवेगौडा यांनी हा राजकीय पेच सोडवण्याचे नेतृत्व स्वीकारले आहे.
काँग्रेसचे राज्याचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल बंगळुरु येथे आले असून एका खासगी हॉटेलमध्ये ते पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. जेडीएसमधील ज्येष्ठ नेते एच. डी. देवेगौडाही मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या अनुपस्थितीत पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आज सायंकाळी कुमारस्वामी अमेरिकेच्या खासगी दौऱ्यावरून परतत आहेत.
काँग्रेसचे डी. के. शिवकुमार हेही देवेगौडांच्या भेटीला पोहोचले आहेत. शिवकुमार यांनी काल आमदारांचे राजीनामे फाडून टाकत त्यांना सरकारमधून बाहेर पडण्यापासून रोखले होते. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही सर्व काही ठीक असल्याचे म्हटले आहे. 'आघाडी सरकार पडण्याचा धोका नाही. ते सुरक्षित आहे,' असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री बदलाची चर्चा केवळ अफवा - खरगे
वरिष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही बंडखोर आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे. १२ जुलैपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असे खरगे म्हणाले. १२ जुलैला विधानसभेचे सत्र सुरु होणार आहे. तसेच, खरगे यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. 'भाजप केवळ त्यांची सत्ता नसलेल्या राज्यांमधील सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील लोकशाहीला काय झाले आहे, या विचाराने मी चिंतेत आहे. भाजपने राजीनामा देणाऱ्या आमदारांना विशेष विमानाने मुंबईला नेले. जे घडतेय, ते योग्य नाही,' असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस-जेडीएसच्या ११ आमदारांनी शनिवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवले. त्यामुळे अवघे १३ महिन्यांचे आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. राजीनामा देणाऱ्यांपैकी जेडीएसचे आमदार एच. विश्वनाथ यांनी एकूण १४ आमदारांनी राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी अद्याप कोणताही राजीनामा संमत केलेला नाही. राजीनामा दिलेल्यांपैकी १० आमदार सध्या मुंबईत आहेत.
'कर्नाटक राजकीय पेच' निवारणाचा सुकाणू देवे गौडांच्या हाती, कुमारस्वामी लवकरच परतणार
बंगळुरु - कर्नाटक राजकीय पेचामुळे काँग्रेस आणि जेडीएसच्या सकाळपासून सतत बैठका झडत आहेत. सरकार वाचवण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग चोखाळले जात आहेत. शनिवारी सत्ताधारी जेडीएस आणि काँग्रेसच्या ११ आमदारांनी तडकाफडकी राजीनामे दिल्यामुळे सरकार अस्थिर झाले आहे.
काँग्रेसचे राज्याचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल बंगळुरु येथे आले असून एका खासगी हॉटेलमध्ये ते पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. माजी पंतप्रधान आणि जेडीएसमधील ज्येष्ठ नेते एच. डी. देवेगौडाही मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या अनुपस्थितीत पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आज सायंकाळी कुमारस्वामी अमेरिकेच्या खासगी दौऱ्यावरून परतत आहेत.

Conclusion: