ETV Bharat / bharat

काँग्रेसची बैठक सुरू झाल्यानंतर येदियुराप्पा म्हणाले, 'वेट अॅण्ड सी'

११ आमदारांच्या राजीनाम्यामुळे आघाडी सरकारला खिंडार पडले आहे. सध्या आघाडीची गोळाबेरीज १०५ वर आली आहे. बहुमतासाठी आवश्यक ११३ जागांपासून ते सध्या ८ ने दूर आहेत.

येदियुराप्पा, मल्लिकार्जुन खरगे
author img

By

Published : Jul 7, 2019, 3:52 PM IST

बंगळुरु - कर्नाटक सरकारला राजकीय हादरे बसत आहेत. काल (शनिवार) काँग्रेस-जेडीएसच्या ११ आमदारांनी राजीनामे दिले. यानंतर तातडीने काँग्रेसची बैठक बोलावण्यात आली. कर्नाटकातील आघाडी सरकार अस्थिर करण्यामागे भाजपच्या 'ऑपरेशन कमळ' आणि माजी मुख्यमंत्री येदियुराप्पांचा प्रभाव असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, या सर्व घडामोडींशी आपला काही संबंध नसल्याचे येदियुराप्पा यांनी म्हटले आहे.

वरिष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही गोंधळाची स्थिती सावरण्यासाठी धाव घेतली आहे. 'रामलिंग रेड्डी हे काँग्रेसमधील बंगळुरु येथील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांची तक्रार जाणून घेणे आवश्यक आहे,' असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या राजीनाम्याने आश्चर्य वाटल्याचे खरगे म्हणाले. दरम्यान, राजीनामा प्रकरणाशी आपला संबंध नाही, असे येदियुराप्पा म्हणाले. तसेच, काँग्रेसची बाठक सुरू झाल्यानंतर त्यांनी 'वेट अॅण्ड सी' असे म्हटले आहे.

'मी तुमकूर येथे निघालो आहे. ४ वाजेपर्यंत परत येईन. तुम्हाला राजकीय घडामोडी माहिती आहेत. सध्या आपण वाट पाहू आणि काय घडतेय ते बघू (लेट्स् वेट अॅण्ड सी). एच. डी. कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या काय म्हणतात यावर मला उत्तर द्यायचे नाही. माझा या सगळ्याशी काही संबंध नाही,' असे येदियुराप्पा माध्यमांशी बोलताना म्हणाले.

खरगे यांना त्यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या शक्यतेविषयी विचारले असता, त्यांनी याविषयी माहिती नसल्याचे सांगितले. 'मला माहीत नाही. हे आघाडी सरकार चालावे, असे मला वाटते. हे सर्व सुरळित व्हावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला तोडण्याच्या उद्देशाने माध्यमांना काही माहिती दिली जात आहे,' असे ते म्हणाले.

रामलिंग रेड्डी यांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता, खरगे यांनी रेड्डी हे काँग्रेसमधील महत्त्वाची व्यक्ती असल्याचे सांगितले. त्यांनी आतापर्यंत खूप मोठा कालावधी बंगळुरुचा किल्ला समर्थपणे सांभाळला आहे. त्यांची तक्रार काय आहे ती पाहू आणि त्यावर आम्ही काय करू शकतो हेही पाहू,' असे खरगे म्हणाले.

११ आमदारांच्या राजीनाम्यामुळे आघाडी सरकारला खिंडार पडले आहे. सध्या आघाडीची गोळाबेरीज १०५ वर आली आहे. बहुमतासाठी आवश्यक ११३ जागांपासून ते सध्या ८ ने दूर आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला आनंद सिंह आणि रमेश झारकीहोली यांनी राजीनामे दिले होते.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.