बेंगळुरू - कर्नाटक राज्य सरकारने एएमपीसी कायद्यामध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ राज्य काँग्रेसने आज विधानसभा भवनाच्या बाहेर आंदोलन केले.
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी असे जाहीर केले होते, की एएमपीसी (अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी) कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांचाच फायदा होईल. या सुधारणांमुळे एएमपीसीच्या हक्कांवर गदा येणार नाही, त्यांच्या कामावर राज्य संचलनालयाचे लक्ष राहील. कायद्यामधील सुधारणांमुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. तसेच, बाजाराच्या चढ-उतारामुळे होणारे त्यांचे नुकसान टळेल, असे येडीयुरप्पांनी सांगितले होते.
२०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट..
यासोबतच येडीयुरप्पांनी असा दावा केला होता, की कायद्यातील सुधारणांमुळे २०२२पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. आम्ही हा कायदा पूर्णपणे नाही बदलला, तर त्यातील केवळ दोन सेक्शन बदलले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा :२५ मेपासून सुरू होणार देशांतर्गत विमान सेवा; नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती..