बंगळुरु - कर्नाटकात येडीयुराप्पा सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी आज १० मंत्री शपथ घेतील, अशी माहिती दिली आहे. पक्षाध्यक्ष आणि इतर नेत्यांच्या सल्ल्यांनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - निर्भया प्रकरण : दोषी अक्षय ठाकुरची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
'मी पक्षाच्या सर्व नेत्यांना दिल्लीमध्ये भेटणार आहे. त्यानंतरच आणखी कोणाचा मंत्रिमंडळात समावेश करावा की नाही, याविषयी निर्णय घेण्यात येईल. पक्षातील वरिष्ठांच्या सांगण्यानुसार सध्या १० मंत्री गुरुवारी शपथ घेतील,' असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - मध्य प्रदेश : मुले चोरीच्या संशयावरून सहा शेतकऱ्यांना मारहाण, एकाचा मृत्यू
'उमेश कट्टी यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार आहे, यावर काही संशय नाही. त्यांच्या मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येणार आहे. मात्र, आताच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही,' असेही मुख्यमंत्री येडीयुराप्पा म्हणाले.