बंगळूरू - राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर विधानसभा सभापती रमेश कुमार यांच्याविरूध्द भाजप अविश्वास ठराव मांडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला नाही, तर पक्षाकडून अविश्वास ठराव मांडला जाणार आहे.
विरोधीपक्षाची व्यक्ती अध्यक्ष होऊ शकत नाही. त्यामुळे कुमार यांना विधानसभा सभापतीपद सोडण्यासाठी संदेश देण्यात आला आहे. आम्ही कुमार यांच्या राजीनाम्याची वाट पाहू. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्याविरुद्ध आम्ही अविश्वास ठराव मांडू , असे भाजपच्या एका आमदाराने सांगितले.
विश्वासदर्शक ठरावात भाजपच्या बाजूने १०५ मते पडली तर काँग्रेस पक्षाला ९९ मते मिळाली. त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस-जेडी(एस)चे सरकार कोसळले. काँग्रेस-जेडी(एस)चे सरकार बहुमत चाचणीत फेल झाल्यानंतर येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.