कुल्लू (हिमाचल)- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने रविवारी आपल्या कवितेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'आसमां' असे या कवितेचे नाव आहे. कंगनाने ही कविता स्वत:च्या आवाजात रेकॅार्ड केली आहे.
-
Poem I wrote and shot this summer, as winter approaches reminiscing Aasman ❤️ pic.twitter.com/AairtGXdjh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Poem I wrote and shot this summer, as winter approaches reminiscing Aasman ❤️ pic.twitter.com/AairtGXdjh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 1, 2020Poem I wrote and shot this summer, as winter approaches reminiscing Aasman ❤️ pic.twitter.com/AairtGXdjh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 1, 2020
या कवितेसह तिने तिच्या मनालीच्या घराचे काही दृश्य व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. या दृश्यांमध्ये कंगनाच्या घरातील बागांची काही छायाचित्रे, फुले, आकाश आणि तिच्या घरातील काही छायाचित्रांचा समावेश आहे. या उन्हाळ्यात मी या कविता लिहिल्या आणि चित्रित केल्या आहेत, असे कंगनाने म्हटले आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून कंगना आपल्या मनालीच्या घरी आपल्या कुटुंबियांसह राहत आहे. यादरम्यान ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होती. तिने अनेकदा आपल्या घराची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. लॉकडाऊन दरम्यान तिने आपल्या कुटुंबासमवेत घालवलेल्या क्षणांची काही छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर कंगना रनौत चांगलीच चर्चेत आहे.
तेव्हापासून कंगना आणि महाराष्ट्र सरकारमध्ये संघर्ष सुरू
अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर कंगना बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि ड्रग्जविषयी उघडपणे बोलली. त्यानंतर सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूवरून तिने मुंबई पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर, बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील घरावर तोडफोड केली. त्याचवेळी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने कंगना रनौतवर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून कंगना आणि महाराष्ट्र सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे. सोशल मीडियावर कंगना महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका करत आहे.