ETV Bharat / bharat

बाबरी मशीद विध्वंस प्रकरण : सीबीआयचे विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला देणार निर्णय

author img

By

Published : Sep 16, 2020, 5:59 PM IST

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआयचे (केंद्रीय अन्वेषण विभाग) विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला निकाल जाहीर करणार आहे. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी जवळपास 49 जणांवर आरोप होते. त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

बाबरी मशीद प्रकरण
बाबरी मशीद प्रकरण

नवी दिल्ली - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआयचे (केंद्रीय अन्वेषण विभाग) विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला निकाल जाहीर करणार आहे. याप्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह 32 जणांना निकालाच्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी जवळपास 49 जणांवर आरोप होते. मात्र, त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, गिरिराज किशोर, विष्णूहरी डालमिया यांचा समावेश आहे.

अयोध्येतील बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992ला कारसेवकांकडून पाडण्यात आली होती. त्यावेळी लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे राम मंदिर अभियानाचे प्रमुख नेते होते. लालकृष्ण आडवाणी यांनी 24 जुलैला लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांना 100पेक्षा अधिक प्रश्न विचारण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.