वॉशिंग्टन डी. सी. - भारतीय वंशाचे असलेले आणि 'द हफिंग्टन पोस्ट'साठी काम करणारे ज्येष्ठ पत्रकार शिरीष दाते यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना खोटारडा म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत दाते यांनी ट्रम्प यांना "तुम्ही गेल्या साडेतीन वर्षात जे-जे खोटे बोलले आहात त्याबाबत तुम्हाला कधी वाईट वाटत नाही का?"
-
For five years I've been wanting to ask him that.
— S.V. Dáte (@svdate) August 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">For five years I've been wanting to ask him that.
— S.V. Dáte (@svdate) August 13, 2020For five years I've been wanting to ask him that.
— S.V. Dáte (@svdate) August 13, 2020
शिरीष दाते यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या प्रश्नाला ऐकूण न ऐकल्यासारखे करत उत्तर देणे टाळले. या प्रकारानंतर मात्र, अमेरिकेतील ट्रम्प विरोधकांना शिरीष दाते यांची ट्विटरवर मोठ्या प्रमाणात स्तुती केली. स्वत: शिरीष दाते यांनीही एक ट्विट टाकले की, "मला गेल्या पाच वर्षांपासून ट्रम्प यांना हा प्रश्न विचारायचा होता". त्या ट्विटमध्ये त्यांनी जानेवारी महिन्यात लिहिलेल्या ६ हजार ५०० शब्दांच्या एका लेखाची लिंकही शेअर केली आहे. त्या लेखाला त्यांनी 'द मिनिस्ट्री ऑफ अनट्रुथ' असे नाव दिले होते.
मूळचे महाराष्ट्रीय असलेले शिरीष दाते यांना पत्रकारितेचा २५ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एनपीआर आणि एपी अमेरिकन प्रकाशनांसाठीही काम केले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी मिळवलेली आहे. त्यांचे 'फायनल ऑर्बिट' नावाचे एक पुस्तकही प्रकाशित झालेले आहे.