श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाई करत एका दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून सोपोर जिल्ह्यामध्ये आज(शनिवारी) ही कारवाई करण्यात आली आहे.
-
Jammu and Kashmir: In a joint operation, Indian Army and Jammu and Kashmir Police have arrested one Lashkar-e-Taiba (LeT) terrorist in Sopore pic.twitter.com/eTPEpj3OmB
— ANI (@ANI) November 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Jammu and Kashmir: In a joint operation, Indian Army and Jammu and Kashmir Police have arrested one Lashkar-e-Taiba (LeT) terrorist in Sopore pic.twitter.com/eTPEpj3OmB
— ANI (@ANI) November 2, 2019Jammu and Kashmir: In a joint operation, Indian Army and Jammu and Kashmir Police have arrested one Lashkar-e-Taiba (LeT) terrorist in Sopore pic.twitter.com/eTPEpj3OmB
— ANI (@ANI) November 2, 2019
काश्मीर खोऱ्यात मागील काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवादी सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत. तसेच व्यापार आणि व्यवसाय ठप्प करण्यासाठी ट्रक चालकांवर हल्ले करण्यात येत आहेत. लष्कराने दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्या हस्तकांना पकडण्यासाठी कंबर कसली आहे.
ऑक्टोबर महिन्यात सफरचंदानी भरलेल्या ट्रकवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी ट्रक चालकाची गोळ्या घालून हत्या करुन ट्रक पेटवून दिला होता. या हल्ल्यातून ट्रक चालकाचा सहकारी पळून गेल्याने थोडक्यात बचावला होता. दहशतवादी व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.