गंगटोक - केंद्र सरकारने नुकतेच अरुणाचल प्रदेश राज्यात फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्टिट्यूट उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर आज सिक्किम राज्यात फिल्म सिटी उभारण्याबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधिकाऱ्यांसोबत या प्रस्तावावर चर्चा केली.
सोई सुविधांअभावी विकास नाही -
सिक्किम राज्यात चित्रपट नगरी उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. ईशान्य भारतात अनेक चांगली लोकेशन्स आहेत. मात्र, सोई सुविधांच्या अभावी त्यांचा वापर झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशात फिल्म अन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट उभारण्यास परवानगी दिली आहे, असे ट्विट सिंह यांनी केले आहे.
तरुणांना रोजगार खुले होतील -
अरुणाचल प्रदेशात एफटीआयआय संस्था उभी करण्याची घोषणा २०१८ साली पंतप्रधानांनी केली. पुण्यानंतर देशातील ही दुसरी शाखा आहे. यामुळे ईशान्य भारतातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच मीडिया आणि चित्रपट निर्मितीच्या संधी खुल्या होतील, असे ट्विट सिंह यांनी केले आहे.