गुमला - झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील ओझा-गुणी परिसरात ४ जणांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. सिसई पोलीस ठाणे परिसरात सकारी गावात काठ्या-दांडक्यांनी मारून-मारून ४ लोकांना ठार करण्यात आले. चेहरा झाकलेल्या ८ ते १० जणांनी ही मारहाण केल्याचे सांगण्यात आले.
ओझा-गुनीच्या परिसरात ही घटना घडली. या सर्व लोकांना प्रथम त्यांच्या घरातून बाहेर काढून गावाच्या मध्यभागी आणण्यात आले. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.