नवी दिल्ली - झारखंडमधील गडवा येथे प्रवाशांना घेऊन जाणारी बस १०० फूट खोल दरीत कोसळली. गडवा-रंका मार्गावरुन ही बस जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४० जण जखमी झाले आहेत.
पॉप्युलर नावाची बस छत्तीसगडमधील अंबिकापूरहून डाल्टनगंज येथे निघाली होती. बस वेगात असल्यामुळे घाटात चालकाला नियंत्रण राखता आले नाही. त्यामुळे बस १०० फुट खोल दरीत जाऊन कोसळली. या घटनेत २ जण गंभीर जखमी आहेत. तर, ७ लहान मुलेही जखमी झाली आहेत. गंभीर जखमींना रांची येथील रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.