नवी दिल्ली- माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा हे पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
एच.डी. देवेगौडा हे राज्यसभेची निवडणूक लढविणार असल्याची पुष्टी त्यांचे पुत्र व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी ट्विटवर दिली आहे.
पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी विनंती केल्यामुळे त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सोनिया गांधी आणि अनेक राष्ट्रीय नेत्यांनी आग्रह केल्याचे कुमारस्वामी यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. ते उद्या नामनिर्देशन अर्ज उद्या दाखल करणार आहेत. प्रत्येकाची विनंती मान्य केल्याबद्दल त्यांनी पित्याचे आभारही मानले आहेत.
एच. डी. देवेगौडा यांनी लोकांकडून यश आणि पराजय पाहिला आहे. लोकांसाठी त्यांनी अतिउच्च पदावर स्थान मिळवले आहे. राज्यसभेकरता त्यांना राजी करणे सोपे काम नव्हते. शेवटी त्यांनी प्रत्येकाच्या आशा आणि महत्त्वाकांक्षेला प्रतिसाद दिला आहे. ते राज्याचे सर्वात उच्च प्रतिनिधी राज्यसभेत असतील, असे कुमारस्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.