ETV Bharat / bharat

जपानमध्ये आणीबाणीची घोषणा; राजधानी टोकियोसह 6 भागातील कारभार गव्हर्नरकडे

कोरोना विषाणू मोठ्या वेगाने जगभर पसरत आहे. त्यामुळे लोकांना आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. ही आणीबाणी 6 मे पर्यंत सुरू राहणार असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे म्हणाले.

Japan declares state of emergency
जपानमध्ये आणिबाणीची घोषणा; राजधानी टोकियोसह 6 भागातील कारभार गव्हर्नरकडे
author img

By

Published : Apr 7, 2020, 4:41 PM IST

टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी एका महिन्यासाठी राजधानी टोकियो आणि इतर सहा प्रांतामध्ये आणीबाणी घोषित केली आहे. जगभर कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता, त्यांनी आज (मंगळवारी) हा निर्णय घेतला.

पंतप्रधान शिंजो आबे म्हणाले, जपानमध्ये युरोपीय देशांप्रमाणे टाळेबंदी केली जाणार नाही. आणीबाणी केवळ टोकियो आणि इतर सहा भागांमध्ये (prefectures) लागू केली आहे. याचे अधिकार टोकियो गव्हर्नर युरिको कोईके आणि इतर सहा भागांच्या प्रमुखांकडे असतील. कृपया सोशल डिस्टन्सिंग पाळत कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये.

कोरोना विषाणू जगभर मोठ्या वेगाने पसरत आहे. त्यामुळे लोकांना आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. ही आणीबाणी 6 मे पर्यंत सुरू राहणार असल्याचे शिंजो आबे म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.