ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट - पोलीस महासंचालक

सध्या २०२० मधील पहिला दीड महिना संपत आला आहे. येथे २०१९ तुलनेत तितक्याच कालावधीतील दहशतवादी कारवाया ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे ते म्हणाले. तसेच, त्यांनी तांत्रिक आणि मानवी पातळीवरील पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आल्याचे सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट

author img

By

Published : Feb 14, 2020, 11:51 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजी) दिलबाग सिंग यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची शुक्रवारी भेट घेतली. यादरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना काश्मीरमधील सद्यस्थितीविषयी माहिती दिली. काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी झाल्याचे डीजी सिंह यांनी त्यांना सांगितले.

सध्या २०२० मधील पहिला दीड महिना संपत आला आहे. येथे २०१९ तुलनेत तितक्याच कालावधीतील दहशतवादी कारवाया ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे ते म्हणाले. तसेच, त्यांनी तांत्रिक आणि मानवी पातळीवरील पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आल्याचे सांगितले.

येथे दहशतवाद्यांशी होणाऱ्या चकमकींदरम्यान किंवा मृत दहशतवाद्यांच्या दफनविधीदरम्यान सुरक्षा दलांवर होणारे दगडफेकीचे प्रकार कमी झाले आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित समस्या कमी आहेत. १३ फेब्रुवारीपर्यंत २४ दहशतवाद्यांचा बीमोड करण्यात यश आले आहे. यापैकी २० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले तर, ४ जणांना अटक करण्यात आली. याविषयीही डीजी सिंह यांनी सविस्तर माहिती दिली.

'या सर्व बाबींचा परिणाम म्हणून दक्षिण काश्मीरमधील ७ युवक त्यांच्या घरी परतू शकले आहेत. त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यापासून रोखण्यात यश आले आहे,' असे डीजी दिलबाग सिंह यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.