श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील सोपोरे बसस्थानक परिसरात ग्रेनेड हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. संध्याकाळी सव्वा-चारच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला असून हल्ल्याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
- Sources: #UPDATE 19 injured in a grenade attack near bus stand in Sopore(Jammu and Kashmir:). 6 of the critically injured have been evacuated to Srinagar
सुरूवातीला या हल्ल्यात ६ नागरिक जखमी झाल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले होते. मात्र, आता या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या वाढून आता १९ इतकी झाली आहे. जखमींपैकी सहा जणांची स्थिती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. यामुळे तातडीने त्यांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
-
#UPDATE Kashmir Zone Police: Terrorists lobbed a grenade on civilians at bus stand in Sopore. Six civilians sustained injuries. Information is preliminary in nature. https://t.co/XMFrLYJVsE
— ANI (@ANI) October 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE Kashmir Zone Police: Terrorists lobbed a grenade on civilians at bus stand in Sopore. Six civilians sustained injuries. Information is preliminary in nature. https://t.co/XMFrLYJVsE
— ANI (@ANI) October 28, 2019#UPDATE Kashmir Zone Police: Terrorists lobbed a grenade on civilians at bus stand in Sopore. Six civilians sustained injuries. Information is preliminary in nature. https://t.co/XMFrLYJVsE
— ANI (@ANI) October 28, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथील हॉटेल प्लाझाजवळ संध्याकाळी सव्वा-चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात १९ नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी सीआरपीएफचे जवान दाखल झाले असून परिसराला घेराव घातला आहे. तसेच, दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी, श्रीनगरच्या काका सराय भागात दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे ६ जवान जखमी झाले होते. अतिरेक्यांनी CRPF आणि पोलीस दलाच्या जवानांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या ६ जवानांवर उपचार सुरू होते.