श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये कारमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा यावेळी येथून जात होता. कारमधील सिलिंडरचा स्फोट झाला असून हा हल्ला नसल्याचे सीआरपीएफने सांगितले आहे.
शनिवारी सकाळी १०:३० वाजता सीआरपीएफच्या ५४व्या बटालियनमधील बस संख्या एचआर ६६-८०६७ महामार्गावरुन जात होती. इतक्यात काही अंतरावर कारमध्ये स्फोट झाला. कारचालक फरार असल्याचे सांगितले जात आहे.
कारमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. सीआरपीएफचा ताफा घटनास्थळापासून खूप अंतरावर होता. त्यामुळे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला, असे म्हणता येणार नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे सीआरपीएफकडून स्पष्ट करण्यात आले आहे.