नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. देशाची राजधानी दिल्लीमधील जामिया मिलिया विद्यापीठाची वेबसाईट डार्क नाईट हॅकरकडून हॅक करण्यात आली आहे. हॅकरने वेबसाईटवर आपण आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचा मेसेज दिला आहे.
हेही वाचा - लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार, आंदोलकांनी पोलीस चौकीला लावली आग
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. काल रविवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झाली. पोलिसांनी विनापरवानगी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी संघटना केला होता. विद्यापीठातील आंदोलनानंतर देशभरात त्याचे प्रतिसाद उमटले आहेत.
हेही वाचा - 'सरकार भारताचा आवाज दाबू शकत नाही', राहुल गांधींची टीका