नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाच्या विविध क्लृप्त्या शोधून काढत आहेत. काही दिवसांपूर्वी सीएए विरोधात विद्यापीठाबाहेर रस्ते रंगवल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता 'डिटेन्शन सेंटर' सुरू करत स्वत:ला आतमध्ये कोंडून घेतले आहे.
Jamia CAA protest: आधी घोषणांनी रस्ते रंगवले, आता विद्यापीठातच 'डिटेन्शन सेंटर' बनवलं - जामिया आंदोलन
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाच्या विविध क्लृप्त्या शोधून काढत आहेत.
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाच्या विविध क्लृप्त्या शोधून काढत आहेत. काही दिवसांपूर्वी सीएए विरोधात विद्यापीठाबाहेर रस्ते रंगवल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता 'डिटेन्शन सेंटर' सुरू करत स्वत:ला आतमध्ये कोंडून घेतले आहे.
Jamia CAA protest: आधी घोषणांनी रस्ते रंगवले, आता विद्यापीठातच 'डिटेंशन सेंटर' बनवलं
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाच्या विविध क्लृप्त्या शोधून काढत आहेत. काही दिवसांपूर्वी सीएए विरोधात विद्यापीठाबाहेर रस्ते रंगवल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता 'डिटेंशन सेंटर' सुरू करत स्वत:ला आतमध्ये कोंडून घेतले आहे.
का सुरू केलं डिटेंशन सेंटर?
सरकारपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे डिटेंशन सेंटर सुरू केले आहे. यामध्ये विद्यार्थी स्वत:ला कोंडून घेत आहेत. कोणत्याच धर्माच्या नागरिकांना डिटेंशन सेंटरमध्ये जावे लागू नये, अशी आमची मागणी आहे. यास विरोध करण्यासाठी विद्यापीठ परिसरात परिसरात डिटेंशन सेंटर बनवल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
सीएए संविधानाच्या विरोधात आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा देशाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही या डिटेंशन सेंटरमधून सीएए कायद्याचा विरोध करत आहोत, असे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थाने सांगितले. जामिया विद्यापीठ आणि शाहीन बाग परिसरात १५ डिसेंबरपासून सीएए विरोधात आंदोलन सुरू आहे.