नवी दिल्ली - देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी हे रशियामध्ये द्विपक्षीय बैठकीत भेटणार असल्याची शक्यता आहे. दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनमध्ये (एससीओ) सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपून दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक अत्यंत तणावाची स्थिती आहे.
भारत-चीनचे परराष्ट्रमंत्री हे लॅचेऑनमधील रशिया-भारत-चीन (आरआयसी) देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीतही भेटणार असल्याची शक्यता आहे. पूर्व लडाखमधील तणावाच्या स्थितीवर मार्ग काढणे, हा भारत-चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरणार आहे. पूर्व लडाखमधील सीमारेषेनजीक पहिल्यांदाच ४५ वर्षानंतर गोळीबार झाला. या गोळीबारानंतर दोन्ही देशांनी एकमेकांना जबाबदार धरत आरोप केले आहेत.
देशाचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री आणि एससीओचे संयोजक सर्जी लॅव्रोव यांची भेट घेतली. त्यानंतर जयशंकर यांनी उत्कृष्ट चर्चा झाल्याचे सांगितले. चीनच्या सैन्यदलाने पँगाँगच्या तलावाच्या दक्षिणेजवळ ७ सप्टेंबरला येण्याचा प्रयत्न केल्याचे भारतीय सैन्यदलाने मंगळवारी म्हटले होते. चीनच्या सैन्यदलाने उलट भारतीय सैन्यदलानेच सीमारेषा ओलांडल्याचा आरोप केला होता. दोन्ही देशांच्या कमांडरपातळीवरील हॉटलाईनच्या संवादात बाचाबाची झाली होती. त्यानंतरही दोन्ही देशांचे कमांडिंग ऑफिसर एकमेकांच्या संपर्कात आहेत. असे असले तरी पूर्व लडाखमधील स्थिती तणावपूर्ण असल्याचे सूत्राने सांगितले.