ETV Bharat / bharat

जैशकडून हल्ल्याची शक्यता; गृह मंत्रालयाकडून सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणांना 'अलर्ट' - union home ministry alert

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले होण्याची तसेच, घातपाती कृत्ये केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

गृह मंत्रालय
author img

By

Published : Aug 7, 2019, 9:46 PM IST

Updated : Aug 7, 2019, 10:18 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणांना 'अलर्ट' दिला आहे. पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले होण्याची तसेच, घातपाती कृत्ये केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

भारतीय गुप्तहेर विभागाने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद देशात घातपाती कृत्ये घडवून आणण्याची शक्यता असल्याचा अहवाल दिला आहे. भारतीय संसदेने जम्मू-काश्मीरसंबंधित आर्टिकल ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून गंभीर परिणामांचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान शक्य त्या सर्व वैध-अवैध मार्गांचा अवलंब करण्याची शक्यता आहे. आता गुप्तहेर विभागाने जम्मू-काश्मीर, दिल्ली, मुंबई आदी ठिकाणी घातपाती कृत्ये करण्याची शक्यता वर्तविली आहे.

अहवालानुसार, जैशच्या म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा लहान भाऊ रौफ अझहर सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचला आहे. त्याला रावळपिंडी येथून सूचना देण्यात आल्या होत्या. भारतीय संसदेने जम्मू-काश्मीरसंबंधित आर्टिकल ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या घडामोडी घडून आल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे (एनएसए) अजित डोवाल यांनी जम्मू-काश्मीर येथे जाऊन तेथील सुरक्षेचा आढावा घेतला. त्यांनी श्रीनगर येथे लष्करी आणि गुप्तहेर खात्यांशी चर्चा केली. तसेच, त्यांनी काश्मीरी लोकांशीही संवाद साधला.

Intro:Body:

jaish e  mohammad might create sabotage in major locations in india union home ministry alerts security intelligence agencies

jaish e  mohammad, sabotage, major locations in india, union home ministry alert, security intelligence agencies alerted

--------------------

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणांना 'अलर्ट' दिला आहे. पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले होण्याची तसेच, घातपाती कृत्ये केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

Conclusion:
Last Updated : Aug 7, 2019, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.