ETV Bharat / bharat

मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी कार्यालयावर फडकवला तिरंगा; भाजप कार्यकर्त्यांना अटक

author img

By

Published : Oct 26, 2020, 4:54 PM IST

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी कार्यालयावर देखील तिरंगा ध्वज फडकवला. भाजपाच्या कार्यकर्त्यांना जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भाजप कार्यकर्त्यांना अटक
भाजप कार्यकर्त्यांना अटक

श्रीनगर - शहरातील लाल चौकातील क्लॉक टॉवरवर ध्वज फडकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'भारत माता की जय' आशा घोषणा दिल्या. याचबरोबर त्यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी कार्यालयावर देखील तिरंगा ध्वज फडकवला. यामुळे सध्या जम्मू काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांना जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची जवळपास 8 महिन्यांनंतर नजरकैदैतून सुटका करण्यात आली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत, जोपर्यंत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त होत नाही. तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही, असे म्हटलं होते. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

पीपल्स फॉर गुपकर डिक्लेरेशन -

मेहबुबा मुफ्ती यांनी 15 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी असलेल्या सर्वपक्षीय बैठकीत भाग घेतला होता. काश्मीरला पुन्हा कलम 370चा दर्जा परत मिळावा, यासाठी राज्यातील सर्व पक्षांनी मिळून 'पीपल्स फॉर गुपकर डिक्लेरेशन' या पक्षांची स्थापन केली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अनुच्छेद 370 रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर आणि लोकशाही विरोधी होता. हा निर्णय मागे घेण्यासाठी काश्मिरी जनता मिळून लढा देईल. हे काम सोपं असणार नाही. मात्र, निर्धाराने आम्ही प्रयत्न करू, असे मुफ्ती एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.