ETV Bharat / bharat

स्वत:च्याच रायफलने गोळी मारुन घेत भारतीय जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न - सीआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानाने स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यास तातडीने उपचारासाठी राज्य शासकीय एसएमएचएस रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सीआरपीएफच्या प्रवक्त्याने सांगितले.

जम्मू कश्मीर
जम्मू कश्मीर
author img

By

Published : Aug 12, 2020, 10:15 AM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानाने स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

आज सकाळी सीआरपीएफच्या 141 बटालियनचे निरीक्षक एम. दामोदर याने त्याच्या युनिटमधील सर्व्हिस रायफलने स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यास तातडीने उपचारासाठी राज्य शासकीय एसएमएचएस रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सीआरपीएफच्या प्रवक्त्याने सांगितले.

दरम्यान, वैयक्तिक बाबींमुळे दामोदर गेल्या काही काळापासून अस्वस्थ होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वीही अशीच घटना घडली होती. सीआरपीएफच्या 61 बटालियनच्या कॉन्स्टेबल परवीन मुंडाने श्रीनगरच्या डालगेट भागात आपल्या युनिटमधील सर्व्हिस रायफलने स्वत: ला गोळी मारून घेतली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.