ETV Bharat / bharat

डोनाल्ड ट्रम्पसोबत मुलगी इव्हांका अन् जावई जेरेड कुश्नरही भारत दौऱ्यावर

मुलगी इव्हांका आणि जावई जेरेड कुश्नर ही देखील भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे ट्रम्प आता सहकुटुंब भारत दौऱ्यावर येणार की काय? याची उत्सुकता आहे.

file pic
इव्हांका ट्रम्प आणि जेरेड कुश्नर
author img

By

Published : Feb 21, 2020, 3:04 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला दोन दिवसीय भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याबरोबर पत्नी मेलेनिया या देखील येणार आहेत. मात्र, आता मुलगी इव्हांका आणि जावई जेरेड कुश्नर ही बरोबर येणार असल्याची माहिती मिळत आहे.

इव्हाकां ट्रम्प आणि जेरेड कुश्नर ट्रम्प यांच्या सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. अहमदाबादला आल्यानंतर नमस्ते ट्रम्प कार्यक्रमानंतर ते आग्रा येथील ताज महालला भेट देणार आहेत. इव्हांका ट्रम्प यांनी याआधी २०१७ साली भारताला भेट दिली होती. तर डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा मोठा गाजावाजा सुरू आहे. खुद्द ट्रम्प यांनी भारता येण्याची उत्सुकता असल्याचे मान्य केले आहे. मात्र, व्यापाराच्या मुद्दयावरून ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताने आम्हाला चांगली वागणूक दिली नसल्याचे ट्रम्प म्हणाले. मात्र, भारताता मोठ्या प्रमाणात नागरिक उत्साहात माझे स्वागत करण्यास तयार आहेत. १ कोटीपर्यंत नागरिक माझे स्वागत करायला जमतील,असे वक्तव्य त्यांनी आज केले. मोठे व्यापारी करार भविष्यात करण्यात येणार असून एकप्रकारे त्यांनी मोठा करार होणार नसल्याचा इशारा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.