ETV Bharat / bharat

'आरोग्य कर्मचाऱयांना मदत करणं आपलं सामूहिक कर्तव्य'

'कोरोनाविरोधात लढणाऱया प्रत्येकाचे आणि त्यांचे कुटुंबाचे संरक्षण करणे हे सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे', असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

'आरोग्य कर्मचाऱयांना मदत करणं आपलं सामूहिक कर्तव्य'
'आरोग्य कर्मचाऱयांना मदत करणं आपलं सामूहिक कर्तव्य'
author img

By

Published : Apr 5, 2020, 2:50 PM IST

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. या संकटात डॉक्टर , आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. 'कोरोनाविरोधात लढणाऱया प्रत्येकाचे आणि त्यांचे कुटुंबाचे संरक्षण करणे हे सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे', असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

  • हमारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, टेक्नीशियन, सफाईकर्मी कोरोना के खिलाफ जंग में योद्धा हैं जो जान की बाजी लगाकर काम कर रहे हैं। इनकी मदद करना, इन्हें और इनके परिवारों को सुरक्षित रखना, हर ढंग से हिमायत करना-हम सबका फर्ज है।

    इन जाँबाज योद्धाओं को अपना संदेश दें।#WeAreProudOfYou pic.twitter.com/HUAA1V071J

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रियांका गांधी यांनी शनिवारी टि्वट करत कोरोना विषाणूसाठीच्या चाचण्यांचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला होता. सध्या देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा अपेक्षित परिणाम दिसून येण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या होणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने लवकरात लवकर पावले उचलणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

भारतात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ३०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३,०३० अ‌ॅक्टिव रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जवळपास २६७ लोकांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर देशात कोरोनामुळे ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.