भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-२ काही तासांमध्ये शनिवारी पहाटे दीड ते अडीचच्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या यशस्वी लँडिंगनंतर रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनंतर चंद्रावर स्वतःचा रोव्हर उतरवणारा भारत चौथा देश ठरणार आहे. यामुळे भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण वैज्ञानिक जगताचे लक्ष लागले आहे. या निमित्ताने भारतीय वैज्ञानिकांचा थक्क करणारा प्रवास जाणून घ्या...
- एप्रिल 2003
- भारतातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास 100 वैज्ञानिकांनी तत्कालीन सरकारकडे चांद्रयान मोहिमेसंदर्भात बैठक घेऊन प्रस्ताव सादर केला. यामध्ये भारताचे अंतराळातील योगदान व चंद्राचे पैलू उलगडण्यासंबंधी चर्चा झाली.
- 15 ऑगस्ट 2003
- तात्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींकडून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारताच्या चांद्रयान मोहिमेची घोषणा
- नोव्हेंबर 2003
- भारत सरकारकडून चांद्रयान मोहिमेला हिरवा कंदील
- ऑक्टोबर 2003
- चांद्रयान मोहिमेतील पहिला टप्पा म्हणजेच चांद्रयान - 1 चे सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण
- 2003
- चांद्रयान - 1 मोहीम संपुष्टात
- चांद्रयान -1 मोहिमेकडून 2 वर्ष कार्यरत राहण्याची अपेक्षा होती. परंतु, अचानक काही तांत्रिक बिघाडामुळे 312 दिवसांनंतर चांद्रयान - 1 शी वैज्ञानिकांचा संपर्क तुटला. चांद्रयान - 1 ने काही दिवस चंद्राच्या कक्षेत फिरून माहिती गोळा केल्यानंतर 2012 सालच्या अखेर पर्यंत त्याने चंद्रावर क्रॅश करण्याचा अंदाज होता. मात्र, 2016 मध्ये चंद्रयान - 1 चंद्राच्या कक्षेतच फिरत असल्याचे निदर्शनास आले.
- 2007
- रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमस आणि इस्रो यांमध्ये चांद्रयान - 2 मोहिमेवर एकत्र काम करण्यासंबंधी करार झाला. यानुसार रशिया भारताला तंत्रज्ञानासोबतच लँडर संदर्भात अधिक माहिती पुरवण्यासाठी बैठक झाली.
- सप्टेंबर 2018
- तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारने चांद्रयान - 2 मोहीमेवर काम करण्यास संमती दिली.
- ऑगस्ट 2009
- रशियाची अंतराळ संस्था व इस्रो यांनी मिळून चांद्रयान - 2 चे डिसाईन व रचनेला अंतिम रूप दिले.
- 2013
- रशियाने लँडर देण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर 2016 मध्ये भारतीय वैज्ञानिकांनी स्वतःहून मोहिमेची आखणी करून मोहीम यशस्वी करण्याचे ठरवले. यानंतर संपूर्ण मोहिमेची पुन्हा आखणी करून 2016 मध्ये नव्याने मोहिमेला सुरुवात झाली.
- 2018
- 19 जून 2018 ला झालेल्या बैठकीनंतर 2019 च्या सुरुवातीला चांद्रयान - 2 चे प्रक्षेपण करण्याचे ठरले. यासोबतच तांत्रिक परीक्षणासाठी बैठक पार पडली. त्यानुसार लँडिंगची क्रमवारी तसेच मोहिमेतील अंतिम टप्प्याचे प्लॅनिंग सुरू झाले.
- जून 2019
- 'प्रज्ञान' रोव्हरच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याला लँडर 'विक्रम' मध्ये बसवण्यात आले.
- 7 जुलै 2019
- GSLV MkIII चे लाँचपॅड कडे प्रस्थान; यानाच्या उर्वरित चाचण्या पूर्ण
- 10 जुलै 2019
- अंतिम टप्प्यातील गोष्टींची पूर्तता; क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी
- 15 जुलै 2019
- इस्रोकडून प्रक्षेपणाची तयारी पूर्ण; परंतु, तांत्रिक कारणास्तव प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले.
- 22 जुलै 2019
- श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर वरून चांद्रयान - 2 चे यशस्वी प्रक्षेपण
- 24 जुलै 2019
- चांद्रयान - 2 पृथ्वीच्या पहिल्या कक्षेतून यशस्वी पार
- 2 ऑगस्ट 2019
- पृथ्वीच्या चौथ्या कक्षेतून यशस्वी प्रवास
- 4 ऑगस्ट 2019
- इस्रो कडून चांद्रयान - 2 ने टिपलेले पृथ्वीचे फोटोज् शेअर करण्यात आले
- 14 ऑगस्ट 2019
- चांद्रयान - 2 पृथ्वीच्या सर्व कक्षा ओलांडून बाहेर
- 20 ऑगस्ट 2019
- चांद्रयान - 2 चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे दाखल
- 21 ऑगस्ट 2019
- यानाची चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत एन्ट्री
- 22 ऑगस्ट 2019
- इस्रोने चांद्रयान - 2 ने काढलेले चंद्राचे फोटोज् शेअर केले.
- 2 सप्टेंबर 2019
- लँडर 'विक्रम' चांद्रयान - 2 च्या मुख्य ऑर्बिटर पासून वेगळा
- विक्रमचा चंद्रा नजीकच्या कक्षेने प्रवास सुरु
- ऑर्बिटर भूपृष्ठासासून 100 कि.मी. अंतरावर अवकाशात चंद्रभोवती वर्षभर फिरणार
- 3 सप्टेंबर 2019
- चंद्राच्या पृष्ठ भागाच्या जवळ असणाऱ्या ऑर्बिटमधून बाहेर पडून भूपृष्ठाच्या दिशेने प्रस्थान
- 7 सप्टेंबर 2019
- चांद्रयान - 2 चा लँडर 'विक्रम' शनिवारी पहाटे 1.55 च्या सुमारास चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असल्याची इस्रो कडून घोषणा
- विक्रमचे यशस्वी सॉफ्ट लँडींग झाल्यास त्यातील 'प्रज्ञान' रोव्हर चंद्रच्या भूपृष्ठावर उतरणार