ETV Bharat / bharat

इस्रोची नेत्रदीपक कामगिरी, चांद्रयान-२ ने काढले चंद्राचे पहिले छायाचित्र - इस्रो

चांद्रयान-२ ने चंद्राचे पहिले छायाचित्र पाठवले आहे. यानाने हे छायाचित्र तब्बल २६५० किमी अंतरावरुन काढले आहे.

इस्रोची नेत्रदीपक कामगिरी, चांद्रयान २ काढलेले चंद्राचे पहिले छायाचित्र पाहिलेत?
author img

By

Published : Aug 22, 2019, 4:42 PM IST

Updated : Aug 22, 2019, 8:49 PM IST

बंगळुरु - चांद्रयान-२ वरून चंद्राचे काढलेले पहिले छायाचित्र पाठवले आहे. चांद्रयान 2 ने हे छायाचित्र तब्बल २६५० किमी अंतरावरुन काढले आहे. २१ ऑगस्टला 1 हजार 738 सेकंदांत चांद्रयान-2 चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहचले होते. चांद्रयान मोहिमेतील हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा टप्पा होता.

चांद्रयान-२ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम आहे. पहिल्या चांद्रयान मोहिमेत पाण्याचे रेणू सापडले होते. या मोहिमेत 'चंद्रावर क्षार, पाणी आहे का? कोणते वायू आहेत का? तेथे जीवनाची शक्यता आहे का? याच्या शक्यता पडताळल्या जाणार आहेत. चांद्रयान २ च्या लँडिंगनंतर रोव्हरचा बाहेरचा कॅमेरा सुरू होईल. त्यानंतर तेथील छायाचित्रे मिळू शकतील. लँडिंगनंतर ५.८ तासांनी प्रत्यक्षात परीक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी चांद्रयानाने पृथ्वीचे पहिले छायाचित्र टिपले होते. हे छायाचित्र एलआय ४ या कॅमेऱ्याने ३ ऑगस्टला टिपले होते. दरम्यान, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून चांद्रयान-2 अवकाशात झेपावले आहे. लॉन्चिंगनंतर ५४ दिवसाने म्हणजेच ५ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्रावर पोहचणार आहे. इस्रोच्या या वाटचालीकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे.

Intro:Body:

बळीराजा अजूनही विचारतोय, कर्जमाफी केव्हा मिळणार? -  अजित पवार

परभणी - महाराष्ट्राचा बळीराजा अजूनही विचारतोय की, कर्जमाफी केव्हा मिळणार? ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा या सरकारनं केली होती. पण ही कर्जमाफी खरोखर किती शेतकऱ्यांनी मिळाली असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला केला.

सुरक्षा व्यवस्था भक्कम नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली

अजित पवार यांनी सुरक्षेवरुनही सरकारला धारेवर धरले. सुरक्षा व्यवस्था भक्कम नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात एका रात्रीत ३ खून होतात, असे म्हणत पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा परभणीमध्ये आली, यावेळी आयोजीत सभेत पवार बोलत होते.

दिवंगत आर.आर. पाटील आणि आम्ही सर्वांनी मिळून दरवर्षी 13 हजार याप्रमाणे ५ वर्षांत ६५ हजार पोलिसांची भरती केली होती. मात्र, या सरकारने पोलीस भरती राबवली नसल्याचे पवार म्हणाले.

गेल्या ५ वर्षांत परभणी, सेलू, जिंतूरमध्ये एकही कारखाना या सरकारनं आणला नाही. मग हाताला कामं कसे मिळणार? आता व्यवसाय होत नाही. माल खपत नाही. ऊस, कापूस, सोयाबीनला योग्य भाव नाही. शेतकऱ्यांचे कैवारी फक्त पवार साहेब होते. याची जाणीव शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

 गेल्या निवडणुकीत केली होती. किती शेतकऱ्यांना खरोखर याचा लाभ झाला, असा प्रश्न यांच्या आमदारांना विचारा. तो तुमचा हक्क आहे.

या सरकारनं पोलीस भरती राबवली नाही.सुरक्षा व्यवस्था भक्कम नसल्यानं राज्यात गुन्हेगारी वाढलीय.एकट्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात एका रात्रीत ३ खून होतात! स्व. आर.आर. पाटील आणि आम्ही सर्वांनी मिळून दरवर्षी 13 हजार याप्रमाणे ५ वर्षांत ६५ हजार पोलिसांची भरती केली.

गेल्या ५ वर्षांत माझ्या परभणीत, सेलू, जिंतूरमध्ये एकही कारखाना या सरकारनं आणला नाही.मग हाताला कामं कशी मिळणार? आता व्यवसाय होत नाही. माल खपत नाही. ऊस,कापूस,सोयाबीनला योग्य भाव नाही. शेतकऱ्यांचे कैवारी फक्त पवार साहेब होते. याची जाणीव शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे.

#शिवस्वराज्ययात्रा

महाराष्ट्राचा बळीराजा अजूनही विचारतोय की, कर्जमाफी केव्हा मिळणार? ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा या सरकारनं गेल्या निवडणुकीत केली. किती शेतकऱ्यांना खरोखर याचा लाभ झाला, असा प्रश्न यांच्या आमदारांना विचारा. तो तुमचा हक्क आहे.

#शिवस्वराज्ययात्रा

Conclusion:
Last Updated : Aug 22, 2019, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.