नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले असून भारतामध्येही त्याचे झपाट्याने संक्रमण होत आहे. देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता खबरदारी म्हणून केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी गाड्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर केले आहे.
-
Isolation coaches have been prepared by the Indian Railways to fight the #Coronavirus Pandemic. pic.twitter.com/41T9Q71Zdr
— ANI (@ANI) March 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Isolation coaches have been prepared by the Indian Railways to fight the #Coronavirus Pandemic. pic.twitter.com/41T9Q71Zdr
— ANI (@ANI) March 28, 2020Isolation coaches have been prepared by the Indian Railways to fight the #Coronavirus Pandemic. pic.twitter.com/41T9Q71Zdr
— ANI (@ANI) March 28, 2020
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना साथीच्या आजाराला आळा घालण्याच्या प्रयत्नात भारतीय रेल्वेही मदत करत आहे. रेल्वेने जुन्या प्रवासी गाड्यांचे कोरोनाबाधित रुग्णांसाठी किंवा कोरोना संशयितांसाठी विलगीकरण कक्षात रुपांतर करत आहे. रेल्वेमध्ये औषधे आणि खाद्यपदार्थांचीही व्यवस्था केली गेली आहे. स्लीपर कोचमधील मधला बर्थ तसेच साईडचे बर्थ काढून टाकण्यात आले आहेत.
दरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्या एका पोस्टवर आलेली कॉमेंट शेअर केल होती. अमिताभ यांच्या एका पोस्टर एका व्यक्तीने रेल्वे गाड्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर करण्याची सुचना दिली होती.
-
T 3481 - A most useful idea given on my Insta as a comment :
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🙏🇮🇳👏 pic.twitter.com/iV0Ikcs4oV
">T 3481 - A most useful idea given on my Insta as a comment :
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 25, 2020
🙏🇮🇳👏 pic.twitter.com/iV0Ikcs4oVT 3481 - A most useful idea given on my Insta as a comment :
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 25, 2020
🙏🇮🇳👏 pic.twitter.com/iV0Ikcs4oV
दरम्यान गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे १४९ रुग्ण आढळून आले असून देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८७३ झाली आहे. तसेच यामुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.