ETV Bharat / bharat

केरळ : आयसिसशी सबंधित ३ संशयितांना ५ दिवसाची कोठडी

सोशल मीडियावर तिघेजण आयसिस संबंधीत माहितीचा प्रसार करत होते. तिघेजण श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंट झाहरान हाशीमचे समर्थक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

author img

By

Published : Jun 27, 2019, 7:46 PM IST

आयसिस संबधित संशयित आरोपी

कोईम्बतूर - केरळमध्ये आयसिसशी संबंधित असलेल्या ३ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी आयसिसशी संबंध असल्याच्या आरोपाखाली मोहम्मद हुसेन, शाहजहान आणि सफिउल्लाह या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर तिघेजण आयसिस संबंधीत माहितीचा प्रसार करत होते. सोबतच हे तिघेजण श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंड झाहरान हाशीमचे समर्थक करत असल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांच्या घराचा तपास केला. तपासामध्ये पोलिसांनी मोबाईल्स, सिम कार्ड, कॉम्प्युटर्स, हार्ड डिस्क, बँक खाते, कागदपत्रे, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड आणि इतर संशयित साहित्य आढळले. पोलिसांनी हे सर्व सामान जप्त केले आहे. याप्रकरणातील पुढील तपास चालू आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.