नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांनी गुजरात दौऱ्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.
"विमानतळापासून कार्यक्रमस्थाळापर्यंत माझ्या स्वागतासाठी सात दशलक्ष लोक असणार आहेत, असे मला पंतप्रधान मोदींनी सांगितले. शिवाय, कार्यक्रमस्थळ म्हणजे खरेतर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असणार आहे, असेही मला समजले आहे. हे सर्व फारच रोमांचकारी आहे. मला आशा आहे, की तुम्ही सर्व या कार्यक्रमाचा आनंद घ्याल." असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले होते.
यावर अधीर रंजन म्हणाले, की ट्रम्प यांनी एवढे उत्साही होण्याची गरज नाही. ते प्रभू श्रीराम नाहीत, की आम्ही त्यांची इथे पूजा करू. ते केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भारत आणि अमेरिकादरम्यान होणाऱ्या ट्रेड डीलबाबतही ट्रम्प यांच्यावर टीका केली. अमेरिका ट्रेड डील करण्यास टाळाटाळ करत आहे, कारण त्यांना प्रोटेक्शनिजम कायम राखायचे आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा : '"ईटीव्ही भारत" म्हणजे असे व्यासपीठ, जिथे प्रत्येक भारतीयाला मिळते जागा..'